समता पर्व अंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीय पंथीयांसाठी कार्यशाळा संपन्न -NNL


नांदेड। 
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 26 नोव्हेंबर संविधान दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन  6 डिसेंबर 2022 हा कालावधी सामाजिक समता पर्व म्हणून साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासाठी विविध योजनेबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात आज करण्यात आले होते.   

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघ उत्तर मराठवाडाचे अध्यक्ष अशोक तेरकर हे होते. ज्येष्ठ नागरिक संघ उत्तर मराठवाडाचे सचिव जयवंत सोमवाड, तृतीयपंथी गुरु गौरी बकस, दिव्यांग उद्धव त्र्यंबकराव शेळके, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, समाजकल्याण निरिक्षक श्रीमती माधवी राठोड, समतादूत प्रकल्पाचे प्रकल्पधिकारी सुजाता पोहरे यांची उपस्थिती होती.


ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यांना सार्वजनिक ठिकाणी तसेच घरामध्ये आदरयुक्त वागणुक दिली पाहिजे. सामुहिक ठिकाणी त्यांचा आदर केला पाहिजे. शासनाच्या विविध योजनेचा त्यांनी लाभ घ्यावा व स्वत:चे जीवनमान समृद्ध करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विविध योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन याप्रसंगी करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयात स्वतंत्र हॉल, हेल्पलाईन नंबरची सुविधा देण्यात आली आहे. बसमध्ये सर्व नागरिकांनी आपले प्रामाणिक कर्तव्य म्हणुन त्यांना बसण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. तृतीयपंथी  यांना समाजामध्ये संविधानातंर्गत मानाचा व समानतेचा हक्क म्हणुन त्यांना त्यांचे ओळखपत्र तसेच आधारकार्ड देण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकांने त्यांना समान वागणुक द्यावी, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी बापु दासरी यांनी केले. तृतियंपथी यांच्या कार्यशाळेत 16 तृतीयंपथीयांना ओळखपत्र देण्यात आले.

प्रास्ताविक तालूका समन्वयक श्रीमती अंजली नरवाडे यांनी केले तर सूत्रसंचालन गजानन पांपटवार यांनी केले. शेवटी आभार सहाय्यक ग्रंथपाल श्रीमती ममता गंगातीर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजकल्याण निरिक्षक श्रीमती माधवी राठोड, आर. डी. सुर्यवंशी, खानसोळे, नागुलवार, दवणे, गायकवाड, राठोड, ममता गंगातीर, पेंडकर, इंगेवाड अंजली नरवाडे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी