अन्न वस्त्र निवाऱ्याची जननी मृदा-प्राचार्य डॉ. के.के. पाटील -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
माती देते जन्म, माती देते जीवन, प्रकृती, संस्कृती आणि प्रगतीचं मूळ म्हणजे माती. हीच माती आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे असे प्रतिपादन शंकराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. के.के.पाटील यांनी केले ते जागतिक मृदा दिनानिमित्त भूगोल विभाग, शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूरच्या वतीने आयोजित जागतिक मृदा दिन या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.  

या प्रसंगी महाविद्यालयातील मृदेचे पूजन करून. विद्यार्थ्यांना मृदेची  निर्मिती व महत्त्व सांगण्यात आले. पुढे बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले की, आजच्या जागतिक मृदादिनी  आपल्याला मातीचे महत्त्व सांगण्यासाठी व मातीच्या गुणवत्तेची जाणीव करुन देण्यासाठी दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो.  

प्रदूषण  व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे दरवर्षी मातीची गुणवत्ता ही कमी होत जाते. मातीच्या ऱ्हासामुळे सेंद्रिय पदार्थांचे नुकसान होते आणि जमिनीची सुपीकता कमी होते. अशा परिस्थितीत लोकांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार,2022 च्या जागतिक मृदा दिनाची यावर्षीची थीम "माती: जेथे अन्न सुरू होते" आहे. माती व्यवस्थापनातील वाढती अवहाने सोडवणे, मातीबद्दल लोकांमध्ये जागरुकता वाढवणे, तसेच मातीच्या योग्य सुधारणेसाठी समाजांला प्रोत्साहन देऊन मानवांसाठी निरोगी परिसंस्था आणि निरोगी वातावरण राखणे हा त्याचा उद्देश आहे. 

लोकांना मातीच्या बिघडलेल्या स्थितीबद्दल जागरूक केले जाईल. जून 2013 मध्ये, अन्न आणि कृषी संघटना  परिषदेने 68 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा आग्रह केला. 5 डिसेंबर 2014 हा पहिला अधिकृत जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला. त्या दिवसापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. मातीचा ऱ्हास हा आपल्या परिसंस्थेला धोका असून तो जागतिक स्तरावर मोठा धोका मानला जात आह. विद्यार्थी शेतकऱ्यांना याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी  शंकरराव चव्हाण महाविद्यालयात विभागातर्फे हा दिवस साजरा करून मातीची निर्मिती, महत्त्व, मातीशी संबंधित समस्या, त्यात येणारी आवाहने इत्यादींबद्दल लोकांना जागरूक करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ. पठाण जे.सी.,भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.जी.बिराजदार, प्रा.डाॅ.के.ए.नजम, प्रा.डॉ. काझी एम.के., प्रा.डॉ.परमेश्वर पौळ,  प्रा.डॉ.बालाजी आव्हाड , महाविद्यालयाचे  व शारदा भवन हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी