नांदेड| ०६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधुन डॉ. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमाने कलम ३४२ प्रमाण अदिवासी कोळी महादेव जमातीला आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष पुर्ण झालेले असतांना नांदेड जिल्हयातील कोळी महादेव जमातीच्या ९० टक्के लांकांना अज्ञापपर्यंत अदिवासी जमातीचे प्रमाणपत्र प्रशासी यंत्रनेकडुन मिळालेले नसल्याने या जमातीचे विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला कष्टरी हे संवेधानीक आरक्षणाच्या आथीक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आरक्षणापासुन वंचित आहे. आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकत केलेले असतांना हे अधिकारी कोळी महादेव जमातीस जाती प्रमाणपत्र देण्यास जाणीव पुर्वक टाळाटाळ करीत आलेले आहे.
नांदेड व भोकर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कोळी महादेव जमातीच्या शेकडो जाती प्रमाणपत्र मिळणे बाबत..संचिका सादर केलेले असतांना हि प्रमाणपत्रे देण्यासाठी या विभागाच्या । अधिकाऱ्यांनी जाणीवपुर्वक- टाळाटाळ करुन अदिवासींचे जाती प्रमाणपत्र देण्याचा काबरा सुन २००० व नियम २००३ चे उल्लंघन करुन या जमातीच्या लोकांना गेरकायदेशिर भ्रष्टाचार युक्त मानसिकतेने त्रास देण्यात येत आहे. त्यांच्या संचिका त्रुटी काढुन परत करणे, ५० वर्षाचा पुराबा नाहो. आडनावाची वैधता नाही किंवा जाती प्रमाणपत्र नाही असे चुकीचे गैरकायदेशिर कारणे दाखवुन भ्रष्ट युक्त मानसिकतेने कोळी महादेव जमातीवर अन्याय अत्याचार सुरु आहे.