नांदेड| महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक ढवळे जी. एस., संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली आरेखन चित्र रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सहशिक्षक संतोष घटकार, सरपंच प्रतिनिधी साहेब शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, आनंद गोडबोले, विलास गोडबोले, पांडुरंग गच्चे, पुरभाजी गोडबोले, शंकर गच्चे, माधव गोडबोले, हरीदास पांचाळ, श्रीरंग गच्चे, मारोती चक्रधर, सूरज गोडबोले, हैदर शेख आदींची उपस्थिती होती.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड दक्षिण विभागातील शेवटी बाजीराव केंद्रांतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले. जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. बाबासाहेबांच्या जीवनावर टाकणारी भाषणे चिमुकल्यांनी सादर केली. ग्रामपंचायत कार्यालयातही महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रंगभरण चित्रकला स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच उत्तेजनार्थ क्रमांक मिळविलेल्या आणि सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक आनंद गोडबोले यांनी केले तर आभार संतोष घटकार यांनी मानले.