नवीन नांदेड। हंबर्डे युरोकेअर तर्फे दोन दिवशी विविध आजारावर मोफत शिबिराचे आयोजन केले ४ डिसेंबर रोजी रूग्नसेवा हास्पीटल मुदखेड व वृंदावन हास्पीटल वाजेगाव येथे व ५ रोजी मंगळवारी ऊमरी येथील ओमसाई हास्पीटल येथे करण्यात येणार आहे असुन रूग्णानी यांच्या लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात हर्निया हायड्रोजन मुळव्याध भगंदर अपेंडिक्स व पित्ताशयाचे आजार आतडी व जटाराचे कर्करोग थायरॉईड व स्थानातील गाठी गर्भाशयाच्या पिशवीचे आजार व्हेरिकोज व्हेन पुरुष स्त्रिया व लहान मुलींनी मुलांचे मुतखड्याचे आजार पुरुष ग्रंथीचे आजार किडनी व मूत्राशयाचे कर्करोग पुरुष व नपुसकता याशिवाय विविध आजारावर मार्गदर्शन होणार असून तसेच या शिबिरात रुग्णांच्या आजारावर शस्त्रक्रिया करावी लागल्यास रुग्णांना २० टक्के सूट देण्यात येणार आहे.
दि.४ डिसेंबर रोजी मुदखेड व वाजेगाव रुग्णसेवा हॉस्पिटल चिलवंतकर कॉम्प्लेक्स, राजश्री शाहू विद्यालय जवळ नांदेड नांदेड रोड मुदखेड वेळ नऊ ते दुपारी एक पर्यंत वृंदावन हॉस्पिटल ओम नगर वाजेगाव वेळ दुपारी दोन ते सायंकाळी सहा पर्यंत तसेच दि. ६ डिसेंबर रोजी उमरी येथील ओम साई हॉस्पिटल गेले कॉम्प्लेक्स, बालाजी मंदिर गल्ली उमरी येथे सकाळी ९ ते दुपारी १पर्यंत असणार आहे. हंबर्डे युरो केअर यूरोलॉजी व सर्जिकल पर स्पेशलिस्ट तर्फे परिसरातील सर्व रुग्णांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा आवाहान डॉ. प्रमोद शंकरराव हंबर्डे व डॉ.मनोज शंकराव हंबर्डे यांनी केले आहे.