नविन नांदेड। नांदेड तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या बळीरामपुर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थेट जनतेतुन संरपच पदासाठी १० तर १७ जागेसाठी ११४ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २ डिसेंबर शेवटच्या दिवशी दाखल झाले असून ५ डिसेंबरला दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज छाननी आहे.
नांदेड तालुक्यातील बळीरामपुर ग्रामपंचायत निवडणूक साठी १८ डिसेंबर ला थेट जनतेतुन संरपच पदासाठी तर १७ जागेसाठी निवडणूक होत असुन या वेळेस ओबीसी महिला आरक्षण थेट जनतेतुन संरपच पदासाठी आरक्षण व १७ जागेसाठी या पुर्वी आरक्षण निघाले आहे. आज संरपचपदासाठी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २ डिसेंबर शेवटच्या दिवस असल्याने सकाळपासून उमेदवार व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
तहसीलदार किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकसाठी निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी गजानन नांदेडकर व साहयक म्हणून विजय रणविरकर, रामेश्वर भिंगोरे,रायटेक व कर्मचारी यांच्या ऊपसिथीत थेट निवडणून द्यायचा सरपंच पदाच्या एका जागेसाठी १० तर १७ ग्रामपंचायत सदस्याचा जागेसाठी ११४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत,अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा मंडळ अधिकारी गजानन नांदेडकर यांनी दिली असून ५ डिसेंबरला दाखल केलेल्या उमेदवारांची अर्जाची छाननी होणार आहे.