नवीन नांदेड। असरजन येथील राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल यांना ह.भ.प.भाऊसाहेब महाराज देशमुख पावडेवाडीकर व ह.भ.प.बंडुदेव महाराज ईटोलीकर, दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त वसरणी येथील अंध विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्य चांगले राहावे व त्यांना पाणी शुद्ध मिळावे यासाठी फिल्टर व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. असरजन येथील जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून पेन वही व परीक्षेचे पॅड मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बी.एम. इबितवार, एस.एम.होळंबे,वसुधा निकम, आनेराय भास्कर, संजय पाटील, तातेराव पा.जाधव, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील वैद्य ,उपाध्यक्ष नंदकुमार पाटील वैद्य,अंबादास चिंतलवाड, चंद्रकांत पाटील वैद्य, शिवशंकर बकाल यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.