नविन नांदेड। गुजरात विधानसभा मध्ये सलग सातव्यांदा भाजपाला विजय विकासामुळे मिळाला असल्याचे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी हडको येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात भाजयुमो शहर महानगर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे व भाजपा मंडळ सिडको अध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले.
भाजयुमो शहर महानगर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या वतीने गुजरात राज्य विधानसभा मध्ये सलग सातव्यांदा विजय मिळविल्या बद्दल हडको येथे दि.८ डिसेंबर रोजी सायंकाळी फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये जल्लोष साजरा करण्यात आला, यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रविण साले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य जनार्दन ठाकूर,महानगर सरचिटणीस अँड.दिलीप ठाकूर, सुरेश लोट, संतोष वर्मा, नगरसेविका प्रतिनिधी जनार्दन गुपीले, भाजपा सिडको मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख, दिंगाबर कात्रजकर, गिरीश डहाळे,प्रमोद रेवणवार,मोनु जोशी, उमेश स्वामी,पिटु एकलारे,रवणेश हानगुटे,भुंजग मोरे,दता वरपडे,भोसिकर मामा,कदम, मिलिंद वाघमारे, गजानन खैरे,बाळु घोगरे,विशाल गंडीबे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ऊपसिथीत पदाधिकारी व मान्यवरांनी देश का नेता नरेंद्र मोदी जेसा हो, व भाजपा पक्षाच्या जयघोष केला.
यावेळी साले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केलेल्या विकासात्मक प्रगती केलेल्या कामावर हे यश संपादन केले असल्याचे सांगून जिल्हायांचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे जिल्ह्यातील विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तर जनार्दन ठाकूर,अँड दिलीप ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले, सुत्रसंचलन सिध्दार्थ धुतराज यांनी केले. या वेळी फटाक्यांच्यी आतिषबाजी व जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.