नांदेड। रस्त्यावर कुडकुडत झोपलेल्या निराधारांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून सतत चौथ्या वर्षी " मायेची उब " हा २०२३ ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ नांदेडभूषण संतबाबा बलविंदरसिंघजी व भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून आगामी चाळीस दिवस दररोज मध्यरात्री नांदेड शहरातील विविध रस्त्यावर फिरून ब्लॅंकेट वितरित करण्यात येणार आहेत.
भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने नगीनाघाट नांदेड येथे बाबाजींच्या हस्ते रथाची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून हा उपक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली.संतबाबा बलविंदरसिंघजी यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर निरपेक्षपणे करत असलेल्या विविध सेवा कार्याचे कौतुक केले. प्रवीण साले यांनी मार्गदर्शन करताना ठाकूर यांच्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती दिली. लायन्स प्रादेशिक सचिव योगेश जयस्वाल यांनी असे सांगितले की, यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणखी तेराशे ब्लॅकेटची आवश्यकता असल्यामुळे दानशूर नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले.
यावेळी बाळू खोमणे, जनार्दन ठाकूर, दिलीपसिंह सोडी, डॉ. सचिन उमरेकर, व्यंकट मोकले, अनिलसिंह हजारी, केदार नांदेडकर, राज यादव, सतीश सुगनचंदजी शर्मा, विक्रम टर्के पाटील,मारोती कदम, अनिल गाढे, सुवर्णा जहागीरदार, कैलास महाराज वैष्णव, कालूसिंघ भवानीवाले, आदित्य जहागीरदार, नरेश आलमचंदानी, नांदेडभूषण डॉ. हंसराज वैद्य, विजय गंभीरे ,अशोक धनेगावकर, प्रगती निलपत्रेवार या प्रमुखातिथींच्या हस्ते दोनशे गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. लायंस अन्नपूर्णा अध्यक्ष अरुण काबरा, लायन्स सेंट्रल अध्यक्ष शिवा शिंदे, सुनील साबू,सविता काबरा, सुरेश शर्मा यांनी मोत्याची माळ देऊन सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवा लोट यांनी तर आभार कामाजी सरोदे यांनी मानले.सुमित्रा हेडगे, सुनंदा जाधव पांढरे,लक्ष्मीनिवासजी झंवर देगलूर, सुषमा नरसिंह ठाकूर, स्नेहलता जायस्वाल हैदराबाद,रेणुका सोनी,सीए संजय सितारामजी जाजू,मोहित जयप्रकाश सोनी,वसंत अहिरे, कु.अरुनिता आकाश झंवर,लिलादेवी सितारामजी जाजू, अभिलाषा मालपाणी,सुवर्णा जहागीरदार, शिवराज विंचुरकर, सुनिल काटकर, शरद वडजकर,प्रतीक पतंगे, योगेश जायस्वाल यांनी ब्लॅंकेट साठी देणगी दिलेली आहे.
लुधियाना येथील कारखान्यातून घाऊक स्वरूपात ब्लॅंकेट मागण्यात येत असून एका ब्लॅंकेटचे वजन एक किलो पेक्षा जास्त आहे.एका ब्लॅंकेट ला रबर प्रिंटसह दोनशे रुपये शुल्क लागणार आहे.वीस ब्लॅंकेट साठी चार हजार रुपये खर्च येणार आहे. कमीत कमी वीस ब्लॅंकेट देणाऱ्या दात्यांचे नाव रबर प्रिंट द्वारे ब्लॅंकेट वर टाकून देणगीदारांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. समाज माध्यमाद्वारे ब्लॅंकेट देणाऱ्या दानशूर नागरिकांची यादी उपक्रम संपेपर्यंत दररोज प्रसिद्ध करण्यात येणार असून चाळीस हजार नागरिकापर्यंत पोंहचणार आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष भारती,जगतसिंग ठाकूर,महेंद्र शिंदे,दिगंबर रूमने,नरसिंह द्रौपदीवार यांनी परिश्रम घेतले. गेल्या तीन वर्षापासून मायेची उब हा उपक्रम राबवल्यामुळे नांदेड शहरातील एकाही निराधाराचा थंडीमुळे मृत्यू झाला नसल्याने दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.