देगलूर| प्रज्ञा सूर्य, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोकोपयोगी अभियानास याही वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या अभियानात शहरातील पुढारी कार्यकर्ते पोलिस अधिकारी पत्रकार प्राध्यापक शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार फुलेंना वाहता एक वही एक पेन देऊन महामानवास अभिवादन केले
दरम्यान देगलूर शहरात विकास नरबागे यांच्या पुढाकाराने सातत्याने गेली चार वर्षापासून एक वही एक पेन वाहून आदरांजली वाहण्यात येत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज सकाळपासूनच त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी विविध मान्यवरांनी गर्दी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हार फुले व मेणबत्ती न वाहता एक वही एक पेन या अभियानास प्रतिसाद देऊन या सामाजिक उपक्रमात हातभार लावला.
यामुळे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना याचा सतत चार वर्षापासून फायदा होत आहे तर शहरातील सर्व जाणते व प्रतिष्ठित नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभागी होऊन एकही एक पेन वाहिली यावेळी आयोजक विकास दरबागे यांच्या लोकोपयोगी उपक्रमाबद्दल कौतिक करीत त्यांना या व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शहरातील सर्व मान्यवर पुढारी नेते कार्यकर्ते पत्रकार प्राध्यापक सामाजिक कार्यकर्ते युवक युती विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.