नांदेड। व्ही.आय.टी.एम. समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालय नांदेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मा. हेमंत दुगाणे हे होते.यावेळी प्रा.भाग्यश्री हाळीकर, प्रा.अशोक कुबडे, प्रा.धम्मा डोंगरे, प्रा.ऋतुजा ढेंबरे प्रा. शैला सावळे, ग्रंथपाल अनिल वाव्हाळे, शंतनु सोने, यांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपली मनोगते मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत दुगाने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक तत्त्ववेते तसेच समाजाचे परिवर्तन करते होते.त्यांनी भारतीय राज्यघटना लिहून दलित कष्टकरी आणि बहुजन समाजाला न्याय दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे प्रत्येक क्षेत्रात भरीव कार्य आहे. शेतकरी शेतमजूर महिला, बालक आणि एकंदर सर्वच क्षेत्रात त्यांनी काम केलेले आहे असे उद्गार प्राचार्य हेमंत दुगाने यांनी काढले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना ही समाजाला आणि देशाला सदैव दिशादर्शक आहे आणि दिशा देणारी आहे यातून नक्कीच समाज प्रगतीपथावर पोहोचला आहे. समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवाहाकडे पाहून आपलं जीवन व्यतीत करावे आणि त्यातून एक संदेश घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयातील समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. महाविद्यालयातील कर्मचारी रहमत पठाण व फरीद चाचा इत्यादी कर्मचारी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन सम्राट हाटकर यांनी मानले.