नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलातील एमए/एमएस्सी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि एमए जनसंवाद व पत्रकारिता या अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (दि. १३) शहरातील सुप्रसिद्ध गणराज अॅडव्हर्टाझिंग एजन्सी येथे अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्रो. डॉ. दीपक शिंदे यांनी गणराज अॅडव्हर्टाझिंग एजन्सीचे संचालक साईनाथ अन्नमवार यांना ग्रंथ भेट दिली.
गणराज अॅडव्हर्टाझिंग एजन्सीचे संचालक श्री अन्नमवार आणि व्यवस्थापक श्री सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना अॅडव्हर्टाझिंग एजन्सीच्या कामकाजाची माहिती दिली. मुद्रितमाध्यम, दूरचित्रवाणी, नभोवाणी आणि समाज माध्यमासाठी कशापद्धतीने जाहिरात निर्मिती केली जाते, जाहिरातींचा कसा वापर केला जातो, जाहिरात क्षेत्रातील विविध संधी, मीडिया मॅनेजमेंट आणि वातावरण निर्मिती आदीसंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना श्री अन्नमवार यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी प्रा.डॉ. कैलाश यादव, प्रा. प्रज्ञाकिरण जमदाडे, प्रा. प्रीतम लोणेकर, शुभम नर्तावार, ऋषिका बोरा आदीसह माध्यमशास्त्राचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.