नांदेडच्या आर्चिड अपार्टमेंट येथे पतंजली योगपीठातर्फे योगशिबीर उत्साहात संपन्न -NNL


नांदेड।
दि.3 ते 11डिसेंबर 2022 दरमान 9 दिवसीय निःशुल्क योग विज्ञान एवम् ध्यान शिबीरात महिला, पुरूष,बालगोपाळ, वयोवृध्द नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने शिबीर यशस्वी पणे संपन्न झाले.

गेल्या 9 दिवसापासुन पतंजली योगपीठ, हरिव्दारहुन प्रशिक्षीत योगप्रशिक्षक व मार्गदर्शक यांनी विशेष प्रशिक्षणात 8 प्रकारचे प्राणायाम, मान, पाठ, कंबरदुखी साठीचे पोट व पाठीवरचे आसने, हाथ-पायासाठीचे सुक्ष्म आसने, योगीक जॉगींग, सुर्यनमस्कार सोबतच युवकांसाठी 12 दंड आसने-8 बैठका, बालगोपाळांसाठी उंची व बुध्दी वाढण्याविण्यासाठी शिरसासन, सर्वांगासन, हलासन,ताडासन,पश्चिमोतानासन प्रशिक्षण देण्यात आले. ह्या कालावधीत महिलांची विशेष उपस्थिती होती. 


विशेष रोगोपचारात आहार दिनचर्या व योग प्राणायाम,ध्यानची माहिती पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लंगडापुरे यांनी दिली. तर 2 तास प्रशिक्षण कालावधीत भक्ती गीताने संगीतमय योग करत किसान सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष सितारामजी सोनटक्के यांनी मंत्रमुग्ध केले. अष्टांग योग व योग शास्त्राविषयी विशेष माहिती भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष रामजी शिवपनोर व महिलांसाठी कठीण आसनेचे प्रात्यक्षिके सौ. महानंदाताई माळगे, घरगुती उपचार,जडी-बुटी आयुर्वेदीक उपचाराची माहिती युवाभारत जिल्हाध्यक्ष हनुमंतजी ढगे यांनी दिले.


योगशिबीर समारोप जिल्हा यज्ञ प्रभारी नारायणराव कुलकर्णी  होम हवन यज्ञाने करण्यात आले. तर विशेष अतिथी म्हणुन जिल्हा संघटनमंत्री पंढरीनाथजी कंठेवाड यांची उपस्थिती आणि गोळवलकर गुरूजी रक्तपेढी तर्फे आयोजनात योगसाधक रक्तदात्यांनी रक्तदान केले. दररोज विवीध प्रकारचे काढे,औषधी मोफत वाटण्यात आले. सोबतच व्यसनमुक्ती अभियानांतर्गत सर्वांनी चहा,मादक द्रव्य,/मांसाहार, अंडे, तंबाकु, गुटखा,बिडी, सिगरेट कायमचे सोडल्याचा संकल्प यज्ञास साक्ष मानुन शपथ घेतली. 

ह्या योगशिबीरात विशेष परिश्रम घेणारे ऑर्चिड अपार्टमेंटचे अध्यक्ष गंगाधरराव भरडे,सचिव प्रमोदजी देशपांडे,रत्नाकरजी जोशी,महेशजी जाधव,पिंटु पाटील,सतिश देशमुख,मारोतराव  पावडे,गणेशराव कदम, उमाकांत वडगांवकर,प्रमोदजी पातळे, अॅड. दिपकजी कट्टे,सुरेशजी देशपांडे, जगदीशजी जोगदंड, राजेशजी कदम, पुनमताई पातळे, स्वप्नाताई पाटील,अनिताताई पावडे,शीतल कदम,छाया देशमुख वनिता कुलकर्णी,अल्का जोशी सह इतर भरपुर जण उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी