हदगाव, शे चांदपाशा| हदगाव तालुक्यातील केदरगुडा या गावाच्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील चौथ्या वर्गातील विद्यार्थिनीने शाळेच्या होस्टेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली.माञ या मुलीने आत्माहत्या का केली...? तिच्या रूममध्ये उंच पलंगाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ती सोमवारी मृतावस्थेत आढळली. विशेष म्हणजे यावेळी शाळेचे संबंधित उपस्थित असताना ही दुर्दैवी घटना घडलेली असुन, या घटनेचे नेमके कारण माञ समजु शकलेले नाही.
याबाबतीत समजलेली माहीती अशी की, हदगाव तालुक्यातील माळझरा येथील बाळू देशमुखे यांची ही मुलगी असून, विश्रांती तिचे नाव आहे. दिनांक १२ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान तिने तिच्या रूममध्ये असलेल्या पलंगाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमागे घातपात तर नसावा..? अशी शंकापण व्यक्त करण्यात येत आहे आहे. आत्महत्या असेल तर का केली..? आदी प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेची माहिती मिळताच मनाठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षकघटनास्थळी दाखल झाले होते. राञी तपास सुरु होता माञ या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या बाबतीत त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही
त्याच्या बहीणीमुळे घटना समजली...! विश्रांती देशमुख ने दरवाजा आतून लावून घेतला होता. याच खोलीत राहत तिच्या दोन्ही मोठ्या बहिणी दुपारी आल्या असता आतून दरवाजा बंद दिसुन आला. हा प्रकार लक्षात येताच होस्टेलच्या व्यवस्थापन संबंधितांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी मुलीने गळफास घेतल्याच दिसुन आल्याने तत्काळ पोलिसांनाही माहीती देण्यात आली.
मयत विश्रांतीच्या देशमुखच्या दोन बहिणी सुद्धा याच आश्रम शाळेमध्ये शिकायला आहेत. रात्री उशिरा पर्यंत चारशेहून अधिक व्यक्ती घटनास्थळी उपस्थित झाले होते. सदर घटना समजताच परिसरातील गावाच्या गावक-यानी एकच गर्दी केली होती. या घटनेचा तपास मनाठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक विनोद चव्हाण हे करित आहेत. विशेष या घटनेमुळे आदीवासी समाज संतप्त झाल्याचे दिसुन येत आहे. या घटनेची कसुन चौकशीची मागणी करण्यात आलेली असुन, घटनास्थळी प्रकल्प अधिकारी यांनी पण भेट दिल्याची माहीती मिळाली आहे.