श्री दत्त महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न
प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांने शिकले पाहिजे.- डाॅ गोणारकर
हदगाव, गजानन जिदेवार। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व हदगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्री दत्त कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. १५डिसेंबर रोजी महाविद्यालयातील सभागृहात बी.ए. बी. काॅम, बी .एस्सी पदवीच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रमाण पत्राचे वितरण करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच महाविद्यालय स्तरावर पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे .
समारंभाचे उदघाटन स्वामी रामानंद तीर्थ व संस्थेचे संस्थापक कै मा.आ.बापुराव पाटील आष्टीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष व हदगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा हदगाव हिमायतनगर चे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर , प्रमुख अतिथी स्वारातीम विद्यापीठ माध्यम शास्त्र संकुलाचे प्रा डाॅ. राजेंद्र गोणारकर , प्राचार्य डॉ एस डी स्वामी , वाणिज्य विभाग प्रमुख डॉ संजय पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य स्वामी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा आ नागेश पाटील आष्टीकर यांचे स्वागत केले.
संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने आ.आष्टीकर यांनी मुख्य अतिथी डाॅ गोणारकर यांचे स्वागत केले व मंचावर उपस्थित पाहुणे यांचे स्वागत अतिथ्य केल्यानंतर प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख डाॅ रामेश्वर मोरे यांनी केले व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणवतेचा लेखा जोखा मांडला. पदवी वितरण समारंभाचे मुख्य अतिथी डाॅ गोणारकर यानी पंचतंत्र, महाभारतातील बोध कथा सांगून विद्यार्थ्यांनी मिसिंग इन्फर्मेशन पासून सावधान राहून राष्ट्रहित समजून वर्तन करावे असा संदेश दिला. आणि प्रामाणिक पणे शिकावे असा सला देवून कृषी क्रांती, औद्योगिक क्रांती व माध्यम क्रांती बाबत मार्गदर्शन केले. विद्यापीठाची पदवी घेवून विवेकी तरूण निर्माण झाले पाहिजे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना , माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले की , काळाची गरज ओळखून माजी आमदार कै. बापुराव पाटील आष्टीकर यांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी महाविद्यालयाची स्थापना केली.
उच्च शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात आणली .त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो तरूण अधिकारी , कर्मचारी , प्राध्यापक , शिक्षक सरकारी पदावर गेले . सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून मा.आ.नागेश पाटील आष्टीकर म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी हा शेती व्यवसायाशी निगडीत शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या अनेक समस्यां आहेत. साठ सत्तर टक्के गुण मिळवूनही अनेक पालक इतर काॅलेजला डोनेशन देऊन ॲडमिशन करतात . आणि आम्ही सत्तेचाळीस टक्के असले तरी बिनाडोनेशन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ॲडमिशन देवून विद्यार्थ्यांचे पदवी शिक्षणाचे स्वप्न साकार करतो. आमचे प्राध्यापक अध्यापन करून कला वाणिज्य व विज्ञान शाखेतून सरासरी सत्त्यानव टक्के निकाल देतात ही अभिमानास्पद आहे , असे आष्टीकर यांनी सर्व प्राध्यापक वृंदाचे अभिनंदन करून पदवी प्रमाणपत्र स्वीकार करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर महाविद्यालयातील बी.ए, बी. काॅम, बी.एस्सी , पदवीधारकांना मान्यवरांच्या हस्ते पदवीचे वितरण करण्यात आले. या पदवी समारंभात बी.ए कला शाखेतील कु...पुजा भेणे ,कु मीरा मगर, कु संजीवनी तावडे, शिवानंद कदम , रामदास गायकवाड , बी. काॅम. वाणिज्य शाखेतील. कु. श्वेता तावडे . शुभम पेन्नेवार देवानंद भोसले अभिषेक पावडे, ओंकार शिंदे , बी सीए.मधिल कु आशा लकडे , ओमकारकदम ,किरण काळबांडे अविनाश कांबळे यांच्यासह सर्व उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थींनीनां पदवीचे सन्मान पूर्वक वितरण करण्यात आले.अपंग विद्यार्थ्यांचा पुष्पहार घालून मा.आ. आष्टीकर यांच्या हस्ते सत्कार करून पदवी प्रदान करण्यात आली.
हा भव्य दिव्य कार्यक्रम पार पाडण्याठी प्रा.डाॅ संजय पाटील, राज्यशास्त्र विभाग प्रमुख व कार्यक्रमाचे सुसंगत व प्रवाही सूत्रसंचालन करणारे जेष्ठ प्राध्यापक डाॅ. बी.एम. नरवाडे, मॅथ डिव्हिजन चे प्रमुख प्रा डाॅ पंडित सर, सांस्कृतिक सजावटीसह नियोजनबद्ध कार्यक्रम पार पाडण्यासाठी मराठी विभाग प्रमुख प्रा डाॅ एम एन बिरादार मॅडम यांनी परिश्रम केले तर हिंदी विभाग प्रमुख परिक्षा विभाग प्रमुख प्रा हरिदास बोडखे यांनी पदवी वितरणावर लक्ष केंद्रित करून सर्व विद्यार्थ्यांचे समाधान केले.
या सोहळ्यात वरिष्ठ प्रोफेसर डाॅ वानखेडे सर , प्रा डाॅ. सोनुने , प्रा डाॅ काकडे सर , प्रा.राजेश राऊत, प्रा.देवसरकर सर , प्रा. मेंढे सर , प्रा. टकले सर , प्रा अभय शिंदे शिक्षकेतर कार्यालयीन प्रमुख कैलासराव वानखेडे सर , पंजाबराव कदम सर हरिष हरण , चौरे सर, शेख सर , सार्थक ठोंबरे , सहाय्यक ग्रंथपाल दादाराव ढोले उपस्थित होते. सत्कारानंतर स्वारातीम विद्यापीठ गीताचे प्रा. डाॅ.ज्ञानेश्वर कदम यांनी सादरीकरण केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डाॅ नरवाडे सर व उपस्थित अध्यक्ष , पाहुणे व मान्यवर अतिथी यांचे आभार डाॅ बिरादार मॅडम यांनी व्यक्त केले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.