शालेय साहित्य, ब्लॅकेट वाटप,रुग्णांना फळे वाटपासह विविध कार्यक्रम
माहूर राज ठाकूर। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माहूर च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा पद्मविभूषण खा. शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या निरोगी दीर्घ आयुष्यासाठी माहूर गडावर महाआरती करण्यात आली. व विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
देशाचे माजी कृषि मंत्री पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार यांचा ८२ वा वाढदिवसाचे औचित्य साधून माहूर गडावरील आई रेणुका माता मंदिरात महाआरती करण्यात येऊन कार्यक्रमा ची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर माहूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले, व जिल्हा परिषद शाळा वडरपुरा येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या पेन व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तत्पूर्वी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते केक कापून व मध्य रात्री उघड्यावर झोपणाऱ्यांचा शोध घेऊन ब्लँकेट वाटप करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,नगराध्यक्ष फिरोज भैय्या दोसानी,युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मारोती रेकुलवार, शहराध्यक्ष अमित येवतिकर, सभापती अशोक खडसे,कुंदन राठोड,इरफान सय्यद, अपसर आली,रफिक सौदागर,ओम पाटिल प्रतिक कांबळे रुषिकेश खंदारे, नबी साहाब, बाजीराव राठोड,विकास राठोड,रियाज शेख महमंद हनिफभाई अब्दुल रहेमान शे.अली, राहुल राठोड,तानाजी पवार,इम्रान सुरय्या,सैफ दोसानी,यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.