किनवट तालुका तेलंगणा राज्यात समाविष्ठ होऊ व तेलंगना राज्यात समाविष्ठ करण्याकरिता मागणी -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी।
किनवट हे जिल्ह्याच्या ठीकाणा पासुन १५० कि. मी ते २०० कि. मी एवढ्या अंतरावर आहे देशाच्या स्वातंत्र्यापासुन आज पर्यंत किनवट तालुक्याकडे राज्यातील विविध सरकारनी व प्रशासनानी तथा जिल्ह्याच्या ठीकाणी आलेल्या प्रशासकीय अधिका-यांनी सपशेल दुर्लक्ष केल्याने जिल्ह्याच्या ठीकाणी असलेली विविध शासकीय कार्यालये हि जिल्ह्यातील इतर तालुक्यात निर्माण झाली परंतु राजकिय इच्छाशक्ती अभावी किनवट या पासुन आज पर्यंत वंचित असल्याने या तालुक्यातील नागरीकांना शुल्लक कारण असो कि कोणतेहि शासकीय कारण असो या करिता नांदेडची वारी करावी लागते. यामुळे नांदेड जाणे व येण्याकरिता जी पायपीट करावी लागते ती सुमारे ७० वर्षापासुन सुरु असल्याने नागरीकांमध्ये प्रशासनाविरुध्द प्रचंड रोष आहे. 

नागरीकांच्या मनात असलेली या खदखदीचे केव्हा स्पोट होईल हे सांगणे अवघड असले तरी याची सुरवात बार असोसिएशन किनवट च्या वतीने केली गेली असल्याचे मागील आठवड्यापासुन घडत असलेल्या घडामोडीवरुन निदर्शनास येत आहे. किनवट येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय निर्माण करा अन्यथा आम्ही तेलंगणा राज्यात समाविष्ठ होऊ व तेलंगना राज्यात समाविष्ठ करण्याकरिता मागणी करुन असा आक्रमत पवित्रा बार असोसिएशन चे अध्यक्ष ऍड. अरविंद चव्हाण यांनी सहकारी वकिलासह घेतल्याचे माध्यमांमध्ये प्रकाशित होताच या संदर्भात असहकार आंदोलन व कामबंद आंदोलन हे किनवट वकिल महासंघा तर्फे करण्यात आल्या नंतर जिल्हा न्यायाधिशांनी किनवट येथिल वकिल महासंघाची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली आहे.

परंतु अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय हे नांदेड पासुन जेमतेम ५० कि. मी. एवढ्या अंतरावर असलेल्या मुखेड, बिलोली, कंधार, भोकर याठीकाणी आहेत परंतु किनवट हे १५० कि. मी. तर किनवट तालुक्यातील शेवटचे गाव हे नांदेड पासुन २१० कि. मी अंतरावर आहे. हा एकप्रकारे अन्यायच आहे जो कि किनवट तालुक्यावर सुमारे ७५ वर्षापासुन चालु आहे. कारण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात किनवट येथे असेल तर हत्या, रेप, अट्रोसिटी, विमा दावे, शासना विरुध्द दाखल करावयाचे दावे या व अशा विविध प्रकरणाकरिता जामिण मिळवणे व दावे दाखल करण्याकरिता किनवट येथिल नागरीकांना नांदेड येथे फे-या माराव्या लागतात ह्याच फे-या बंद करण्याची आता वेळ आली असुन या होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडन्याकरिता नागरीकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असुन ज्या प्रकारे रेल्वे रुंदीकरणा करिता सर्व पक्षिय, सर्व पत्रकार संघ, व्यापारी असोसिएशन, बाजार समिती यांच्यासह विविध संघटनांनी रान उभे केले होते.

 तशा प्रकारचे तिव्र आंदोलन पुन्हा एकदा किनवट तालुक्यात उभे करण्याची आवश्यकता असल्याचे सर्वत्र सामाजिक कार्यकर्त्यांकडुन चर्चिले जात आहेत तर आगामी काळात हे आंदोलन हळुहळु तिव्र रुप घेतांना दिसणार यात शंका नाही. कारण किनवट वकिल महासंघाकडुन छेडण्यात आलेल्या या आंदोलनाला विविध संघटनाकडून पाठींबा मिळत असुन किनवट तालुक्यातील या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा प्रश्न तत्काळ सोडवण्यात आला नाही तर किनवट तालुक्याला तेलंगणा राज्यात समाविष्ठ करा हि मागणी सर्व पक्ष, संघटना कडुन करण्यात येऊन या प्रकरणी आक्रमक भुमिका घेण्यात येणार असल्याचे एकंदरीत नागरीकाच्या मानसिकतेतुन निदर्शनास येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी