लोहा| लोहा उपजिल्हा रुग्णालय येथे सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत मानसिक आरोग्य विभाग नांदेड यांच्या मार्फत ६ डिसेंबर रोजी आरोग्य शिबीर ठेवण्यात आके आहे. या कार्यक्रमाअंतर्गत लोहा उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य शिबीर सकाळी १०ते दुपारी २ वाजेपर्यंत या वेळात आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नीलकंठ भोसीकर यांच्या पुढाकाराने हे शिबीर होत आहे.
या आरोग्य शिबीरामध्ये मानसिक आरोग्य, आत्महत्या, प्रतिबंधात्मक कार्यक्रम, व्यसन समस्या व योग विषयक माहिती यांच्याबद्दल योग्य तज्ञामार्फत मोफत तपासणी, जनसामान्यांना आरोग्य विषयी अडचणी विषयी मार्गदर्शन मिळेल. उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य शिबीरात उपलब्ध सेवा मेंदू रोग, पॅरालेसीस, पारकिन्सोनिझन, डिप्रेशन, चिंता, बैचैनी चे आजार, जुनाट डोकेदुखी, व्यसन समस्या, फिट, मिरगी, आकडी समस्या, लैंगिक समस्या, झोपेचे आजार, वयोवृद्ध लोकांमध्ये असलेले विसराळूपण, लहान मुलांमधील व शालेय विद्यार्थ्यामधील मानसिक ताणतणाव व इतर मानसिक आजारावर तपासणी केल्या जातील.
समतोल आहार व योग विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी तालुक्यातील जनतेने या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एन.बारी, मानसोपचार तज्ञ शाहू शिराढोणकर, हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.