अखिल भारतीय हॉकी स्पर्धा 22 डिसेम्बर ते 29 डिसेम्बर दरम्यान आंतरराष्ट्रीयस्तराच्या आणि राष्ट्रीय खेळाडूंसाठी क्रीडांगण सज्ज -NNL


नांदेड़।
नांदेड शहरात श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त येथील दुष्ट दमण क्रीडा युवक मंडळ नांदेड तर्फे आयोजित आणी संचालित अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टोर्नामेंट स्पर्धेस ता. 22 डिसेम्बर, 2022 रोजी सकाळी सुरुवात होत आहे.  यंदा स्पर्धेचे 49 वें वर्ष असून स्पर्धेत देशातील प्रसिद्ध असे १६ नामवंत हॉकी संघ सहभागी होत आहेत अशी माहिती दुष्ट दमण क्रीडा युवक मंडळाचे अध्यक्ष व नगर सेवक सरदार गुरमितसिंघ नवाब (डिम्पल) यांनी दिली. 

श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या नावाने सतत 50 वर्षे चालणारी आणि महाराष्ट्रात नामवंत अशा या हॉकी स्पर्धेचे उदघाटन ता. 22 डिसेम्बर रोजी खालसा हायस्कुल मिनी स्टेडियम मैदानावर होईल. या स्पर्धेची तयारी जोमात सुरु असून मैदान तयार करण्याचे कार्य अंतिम टप्यात आहे. स्पर्धेचे सामने साखळी आणि बाद अशा पद्धतीने खेळविले जाणार आहेत. 


स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघात पंजाब पोलीस जालंधर, सीआरपीएफ दिल्ली, ईएमई जालंधर, बीएसएफ जालंधर, पीएसपीएल पटिआला, सैफई हॉस्टल इटावा, वेस्टर्न रेलवे, आर्टलेरी नासिक, कस्टम मुंबई, आर्टलेरी सिकंदराबाद, साईं एक्सेलेंसी, डी अकादमी पुणे, कॅनडा टाइगर नांदेड, डेक्कन हैदराबाद, युथ क्लब नांदेड, चार साहबजादा नांदेड संघांचे समावेश असेल. यात असंख्य अंतर्राष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूं हॉकी स्पर्धेसाठी नांदेड येथे पोहचणार आहेत. त्यात रघुनाथ वी.आर. (अर्जुन अवॉर्ड विजेता), बलविंदरसिंघ (ओलिंपियन), दीपक ठाकुर (ओलिंपियन), देवेश चव्हाण (अर्जुन अवार्ड विजेता), सिमरनजीतसिंघ (ओलिंपियन), विक्रम राज (अंतर्राष्ट्रीय खेळाडू), हजुरासिंघ व जरमनप्रीतसिंघ (राष्ट्रीय खेळाडू) नांदेड मध्ये दाखल होत आहेत.

जागतिक दर्जाच्या या स्पर्धेसाठी खालसा हायस्कुल मिनी स्टेडियमचा मैदान सज्ज होत आहे. विजेता संघाना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि इतर पारितोषिके देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक सामन्यात सामनावीर पारितोषिक देण्यात येईल. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आणि गोलकीपर यांना हि पारितोषकं देऊन गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धे निमित आंतरराष्ट्रीय व ओल्याम्पीक अनुभव असणारे खेळाडूंचे नांदेड नगरीत आगमन होणार आहे. खेळाडूंच्या राहण्या व खाण्याची सोय आयोजकांतर्फे करण्यात येत आहे. 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिरोमणी दुष्ट दमन क्रीडा युवक मंडळ अध्यक्ष व नगर सेवक सरदार गुरुमित सिंग नवाब, उपाध्यक्ष जितेंदरसिंघ खैरा, सचिव हरविंदरसिंघ कपूर, कोषाध्यक्ष हरप्रीतसिंघ लांगरी, सहसचिव संदीपसिंघ अखबारवाले, सदस्य महिन्दरसिंघ लांगरी, जसपालसिंघ काहलों, महिंदर सिंघ गाडीवाले, अमरदीपसिंघ महाजन, जसबीरसिंघ चिमा, विजय नंदे सह सेवाभावी युवक मंडळी परिश्रम घेत आहेत. आठवडाभर चालणाऱ्या स्पर्धेत खेळ प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी