नांदेड| सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद नांदेडच्या वतिने ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामुल्य (निशुल्क) संधीवात निदान, उपचार व सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर स्वातंत्र्य सेनानी डॉ.दादारावजी वैद्य (आर्य) सभागृह, वैद्य रुग्णालय परिसर वजिराबाद येथे संपन्न झाले.
शिबिरास ज्येष्ठ नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. सुरुवातीस कार्यक्रमाध्यक्ष व ज्येष्ठतम् मार्गदर्शक तथा विचारवंत सुभाषराव बार्हाळे यांचा हृद्य सत्कार डॉ.हंसराज वैद्य यांनी तर डॉ.आशय जयश्री धनाजीराव देशमुख यांचा सत्कार सुभाष बार्हाळे यांनी केला. उपस्थितांना दोघांचाही परिचय डॉ.हंसराज वैद्य यांनी करून दिला. संधीवात तथा रोबोटिक सर्जरी विशेषज्ञ डॉ.आशय देशमुखांनी आपल्या ओघवत्या शैलित उस्थितांना संधीवाताबद्दल सविस्तर पडद्यावर सचित्र माहिती दिली त्यांची मने जिंकली. शिबीरात 230 गरजू संधीवाताच्या रूग्णांची तपासनी व चिकित्सा करून मार्गदर्शन व सल्लाही दिला.
या कामी कु.डॉ.फारूकी सबा, डॉ.प्रदिप गरूड, डॉ.गंगाधर बाबर, कु.डॉ.पल्लवी लांडगे, कु. डॉ.रेशमा जाधव, कु.डॉ.रूचा मुंडे, कु. डॉ.सारिका बावने, कु.डॉ.अज्मतुन्निसा आदिनी डॉ.आशय देशमुखांना मदत केली. शिबिरास सेवा निवृत्त विस्ताराधिकारी श्रीमति प्रभाताई चौधरी, शासन मान्यता प्राप्त ज्येष्ठ पत्रकार तथा कंधार वार्ताचे संपादक माधवराव पवार काटकळंबेकर व प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका श्रीमती गिरामताई यांची विशेष उपस्थिती होती.
शिबीर यशश्वी करण्यासाठी वल्लभ कोसलगे, पांचाळ, जैन व त्यांचे सहकारी, करण व रितेश जोशी, शंकराप्पा स्वामी आणि सौ.ताराबाई शंकराप्पा स्वामी आदिंनी हिरारीने भाग घेऊन सहकार्य केले. या प्रसंगी अशाच प्रकारचे शिबिर याच ठिकाणी फेस्कॉन दिनी (ऋएडउजच ऊअध 12/12/22 रोजी) ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्याचे डॉ.आशय देशमुख यांनी मान्य केले. शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे व शिबिरार्थिंचे अभार डॉ.शीतल भालके यांनी मानले व शिबिराची सांगता झाली.