माहूर, राज ठाकूर। विकासापासून कोसोदूर असलेला कुणबी मराठा समाज प्रामुख्याने शेती व्यवसाय करतो. त्यांना आपल्या उपवर पाल्यांचे विवाह जुळविण्याचे काम फारच खर्चिक व जिकीरीचे बनले आहे. त्यामध्ये समाजाचा पैसा व वेळ मोठ्या प्रमाणात खर्ची पडतो.
नेमकी हीच बाब हेरून पुसद येथील मराठा कुणबी समाज, मराठा युवा मंच व मराठा महिला मंडळ यांच्या संकल्पनेतून गेल्या नउ वर्षापासून मराठा कुणबी समाज, मराठा युवा मंच व मराठा महिला मंडळाच्या संकल्पनेतून कुणबी समाज, मराठा युवा मंच व मराठा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबवित असलेला मराठा कुणबी समाज राज्यस्तरीय उपवर- वधू परिचय मेळावा रविवार दि. १८,१२ रोजी पुसद जि. यवतमाळ येथे स्व.शेषेराव पाटील जिनिंग प्रेसिंग च्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा.भावना गवळी, खा.हेमंत पाटील, आ. अॅड. किरण सरनाईक, माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील, माजी मंत्री संजय देशमुख,माजी मंत्री सुभाष ठाकरे, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आ.नागेश पाटील आष्टीकर, जीवन पाटील, वसंतराव घुईखेडकर, अॅड. सतीश देशमुख, पुसद अर्बन बँकेचे शरद मैंद, प्रवीण देशमुख, नानाभाऊ गाडबैले, तातू देशमुख मुळावेकर, राम देवसरकर, सौ.राजश्री हेमंत पाटील, शिवाजीराव देशमुख सवनेकर, सीताराम ठाकरे पाटील, संदीप पाटील, ठाकरे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर मेळावा यशस्वी होण्याकरिता दीपक काळे, शंकर गावंडे, सुशांत महल्ले व मराठा युवा मंचचे सर्व कार्यकर्ते एकजूटीने परिश्रम घेत असून यासाठी उपवर-वधूचे जवळपास १२०० परिचय पत्रे संकलित करण्यात यश मिळविले आहे. नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील मराठा कुणबी समाज बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन माहूर-किनवट तालुका मराठा-कुणबी समाज समन्वयक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले आहे.