हदगाव, शे. चांदपाशा। तालुक्यातील मनाठा सर्कल मधील केदारगुडा येथील निवासी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत चौथ्या वर्गात असलेल्या मुलीने सोमवारी आत्महत्या केल्याची घटना घडली.
हा सदर दृदवी घटना संशयस्पद दिसत असल्याने मंगळवारी रात्री मयत मुलीच्या नातेवाइकांनी शाळा प्रशासना- वर लगेच गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिस स्टेशन मनाठाच्या समोर ठिय्या मांडला होता. याचबरोबर मागणी मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे प्रशासनासमोर प्रश्न निर्माण होता. या परिस्थितीचे गार्भिय लक्षात येताच पोलिसांनी प्रेत मनाठा मार्ग न आणता अन्य मार्गाने मयत विद्यार्थीनीच्या गावी नेले. आई-वडिलांना समजावून रात्री ९ वाजता मुलीचे अंत्यसंस्कार पार पाडले.
आत्महत्याचे 'गुढ'कायम ...
विश्रांती बाळू देशमुखे (वय १०) हिने सोमवारी (दि. १२) आत्महत्या केली. या प्रक्रणाचे 'गुढ ' कायम असले तरी, मुलीच्या नातेवाइकांनी शाळा प्रशासानावर दुर्लक्ष केल्याचा आरोप मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या कंत्राटी महिला अधीक्षक या दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. कोणासही सोडणार नाही, असे आश्वासन भोकर विभागाच्या पोलिस उपविभागीय अधिकारी शफकत अमना यांनी दिले. तसेच सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक मदत करण्याची शिफारस केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, दिवसभरात त्यांनी अत्यंत बारकाईनं तपास करीत विद्यार्थीनीने आत्महत्या केलेल्या रुमची पाहणी केली ठसेतज्ञद्वरे फिगर प्रिंट पण घेण्यात आल्याची माहीती मिळाली.