नांदेड| महाराष्ट्र शासनाची जनकल्याणकारी योजना शिवभोजन थाळी या योजनेच्या माध्यमातुन समाजातील गरीब आणि गरजू नागरिकांना अल्प दरामध्ये भोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने हि योजना चालू केली आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शिवभोजन केंद्राच्या माध्यमातुन समाजातील गरजू व्यक्ति हातावर पोट असणारे कामगार या योजनेचा लाभ घेत १० रुपयामध्ये पोटभर जेवण करत आहेत. असेच शिवभोजन केंद्र कॅनाल रोड, राजेश नगर तरोडा नाका येथे विष्णू गोडबोले यांंना शासनाकडून मंजूर झाले आहे. या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन नांदेड उत्तरचे आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते ०१ डिसेंबर संपन्न झाले.
या उद्घाटन कार्यक्रमासाठी नगरसेवक प्रतिनिधी दीपक पाटील, नगरसेवक प्रतिनिधी कल्याणकर, रिपाईचे (गवई) जिल्हाध्यक्ष भगवान ढगे,नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे माजी सहाय्यक उपायुक्त प्रकाश येवले, अशोकराज कांबळे, दिपक सातोरे, जिल्हा परिषदेचे मिलिंद व्यवहारे, पद्माकर कोकरे, विजय सावते आदींची उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी आ. कल्याणकर म्हणाले की, महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाली ही गरीब आणि गरजूंसाठीची कल्याणकारी योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे. परिसरातील गरीब, गरजू, कामगार यांनी १० रुपयामध्ये या योजनेचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे आ. बालाजी कल्याणकर आणि इतर प्रमुख पाहण्यांचे हस्ते पुजन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्याचे संचालक विष्णू गोडबोले यांनी शाल पुष्पहाराने स्वागत करुन प्रत्यक्ष शिवभोजन थाळी देवून आ. कल्याणकर यांच्या हस्ते या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन सपन्न झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार भैय्यासाहेब गोडबोले यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी नारायण गोडबोले, गयाबाई गोडबोले,संगिता गोडबोल मारोती सावतगण, एनजीओचे जोंधळे, केशव गोडबोले, शंकर गोडबोले, नगरसेवक बाळु राऊत, राहुल भदरगे, जयश्री जयस्वाल, सुषमा गहेरवार, देशमुख, केशव गोडबोले, विजय गोडबोले, सुदर्शन गोडबोले, अशोक गोडबोले आदींची उपस्थिती होती.