नविन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील धनेगाव येथील ऑटोमोबाईल तर सिडको परिसरातील ज्ञानेशवर नगर येथील रॉकस्टार फाईनस दुकान, सेतू केंद्र व एका किराणा दुकानाचे शटर वाकवुन अज्ञात चोरट्यांनी ५६ हजार रूपयांचा माल लंपास केला असून या चारही चोऱ्या शटर वाकवून केल्याने पोलीसांना चोरटयांनी जणु आव्हान दिले. असल्याने पोलिसांनी हे आव्हान स्वीकारून सिसीटीव्ही फुटेजचा माध्यमातून या चोरीतील तिनं अज्ञात चोरटयांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करीत असल्याचे सांगून लवकरच या गुन्हा यातील आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दिली.
या प्रकरणी,पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश शोभाचंद बोकाडीया धनेगाव येथील बिज केंद्रा समोर व्यंकटेश मोटर नावाचे ऑटो मोबाईल ज्यात ट्रकचे स्पेयर्स पार्टचे विक्री करतो,काल दि.४ डिसेंबर रोजी मी दिवसभर धनेगाव येथील ऑटो मोबाईल्स दुकानावर बसुन सायंकाळी ६ वाजताचे दरम्यान मी दुकान बंद करुन नांदेड येथे घरी गेलो असता आज दि.५ डिसेंबर रोजी घरमालक नामे सतिश शिंदे यांनी मला सकाळी ६ वाजताचे सुमारास फोन करुन कळविले की, तुमच्या ऑटो मोबाईल्सचे सेटर उघड़े दिसत आहे असे कळविल्याने मी लगेच माझ्या घरून धनेगाव येथे ऑटो मोबाईल्सचे सेटर येवुन पाहीला आसता ते सेटर तोडलेले दिसले मी आत मध्ये जावुन सामान पाहीलो असता कॉन्टर बॉक्स मध्ये ठेवलेले 1सि.सि. टि.वी.कॅमेराचे हार्ड डिक्स कि.अ. पाच हजार रुपये व नगदी रक्कम ५६ हजार रुपये असे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
तसेच ज्ञानेश्वरनगर येथील रॉक्सस्टार फन्ससचे सेटर वाकुन नुकसान केल्याचे व सिडको येथील सेतु केंद्राचे देखिल सेटर तोडल्याची व एका किराना दुकानाचे सेटर तोडल्याचे मला समजले आहे.व ज्ञानेश्वरनगर येथील रॉकस्टार फायन्सचे सेटर वाकुन अंदाजे नुकसान ३,००० रुपयाचे केल्याचे व सिडको येथील सेतु केंद्राचे देखिल सेटर तोडुन ४०००- रुपयाचे व एका किराना दुकानाचे सेटर तोडुन २५०० रुपयाचे अशी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन नुकसान केले आहे.
या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी कलम ४५७,४२७,३८० नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेषेराव शिंदे हे अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी अज्ञात चोरटयांचा सिसीटीवी फुटेजचा माध्यमातून शोध घेत असुन तिनं अज्ञात चोरटयांचा शोध लवकरच लावण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी सांगितले.