हिमायतनगर, शंकर बरडे। हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील सुप्रसिद्ध असलेले अखंड सदभक्तांचे आराध्य दैवत श्री गुरु समर्थ रामबापू महाराजांचे मंदिर...या मंदिराला जवळपास शंभर वर्षे ओलांडून गेले होते. त्यामुळे मंदिरावरती खुप साऱ्या भेगा व अनेक छोटे छोटे झूडपे फुटलेली होती.. म्हणून मंदिराचा गेल्या अनेक वर्षांपासून जीर्णोद्धार व्हावा असी सदभक्तांची इच्छा होती.
अनेक सदभक्तांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी सेवा घडावी आणि लाडक्या संतांची भव्य व सुंदर विलोभनीय मंदिर निर्मिती व्हावी अशी तळमळ लागलेली होती. तेव्हा रामबापूच्या कृपा आशीर्वादाने व सर्व सदभक्तांच्या सहकार्याने श्री गुरु समर्थ रामबापू महाराज व रामबापू संस्थांनाचे मठाधिपती ह.भ.प.श्री प्रकाश महाराज यांच्या विचारावरती आणि कार्यावरती मनापासून श्रद्धा ठेवून अनेक सदभक्तांच्या व मान्यवराच्या प्रमुख उपस्थितीत पुर्ननिर्माण रामबापू मंदिराच्या बांधकामचे भूमिपूजन थाटामाटात पार पडले..
यावेळी उपस्थितीत हदगांव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार उत्तमराव इंगळे, बाबुराव कदम कोहलीकर , लोकनेते दादाराव टारपे, उपसरपंच संजय माझळकर, देविदास डाखोरे,धनराज सोनटक्के,किशोर सरकुंडे, परसराम नाईक,गजानन डाखोरे,ह.भ.प रामाराव माने पोटेकर, ह.भ.प.रामराव महाराज धरमवाडीकर, ह.भ.प. मीनानाथ महाराज सोनपेठकर, विश्वनाथ महाराज सोनपेठकर, व ग्रामस्थांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शिवली.