गुरुजी रुग्णालयात “जेष्ठ नागरिकांकरिता सर्वांगीण मोफत आरोग्य तपासणी” शिबिराचे आयोजन -NNL


नांदेड|
सध्या वातावरणातील बदलामुळे अनेक जेष्ठ नागरिकांना विविध आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत असल्याने अशा जेष्ठांना या वातावरणात आवश्यक असणा-या सर्व शारिरीक चाचण्या करण्याचे औचित्य साधून तसेच श्री मथूराशांती प्रतिष्ठान, नांदेड च्या जनक स्वर्गीय श्रीमती शांताबाई डॉ. मथुरादास बजाज यांच्या ५ व्या पुण्यतिथी स्मरणार्थ श्री. गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, नांदेड येथे जेष्ठ नागरिकांकरिता सर्वांगीण मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि-७/१२/२०२२ रोजी सकाळी. १०.०० ते सायं. ३-०० पर्यंत केले आहे .

या शिबिरात जेष्ठ नागरिकांकरिता विनामूल्य  मसाज, BMD मशीनद्वारे हाडांची ठीसुळतेची तपासणी, फिजिओथेरपी, नेत्ररोग तपासणी व मधुमेह चाचणी, दंतरोग तपासणी, रक्तदाब-ब्लड शुगर तपासणी व ECG, दैनंदिन दिनचर्चेबाबत योग्य मार्गदर्शन, आजार व आहार संबंधित समुपदेशन संपूर्णतः मोफत करून त्यांच्या पूर्वचाचण्या तपासणी बाबत यथोचित मार्गदर्शन केले जाणार आहे. 

औषधी, सोनोग्राफी, एक्स-रे याकरिता शिबिरार्थी जेष्ठ रुग्णांना ७५ % सवलत देण्यात येईल.या शिबिराकरिता शिबिरार्थी जेष्ठ नागरिक रुग्णांचे वय ६० पेक्षा जास्त असावे. रुग्णांनी येताना आधार कार्ड सोबत घेऊन यावे, गैरसोय होऊ नये म्हणून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व नावनोंदणी साठी संपर्क:-9370638837/02462-359699 साधावा. तरी गरजूंनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन, श्री गुरुजी रुग्णालयाच्या व्यवस्थापना कडून जनहितार्थ करण्यात येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी