नांदेड। जिल्हा जात पडताळणी कार्यालयात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करून समता पर्वाचा समारोप..!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजाला समतेचा मार्ग दाखवला. उपेक्षित व शोषित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणारे व त्यांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक: 06 डिसेंबर 2022 रोजी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, समितीचे अध्यक्ष, मा. श्री. प्रकाश खपले साहेब, समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मा. श्री. सतेंद्र आऊलवार साहेब यांच्या हस्ते कॅडल मार्च लावून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
शासन निर्णय शासन परिपत्रक क्रमांक: सान्यावि-2022/प्र.क्र.229/बांधकामे दिनांक: 25 नोव्हेंबर 2022 ' दिनांक 26 नोव्हेंबर, संविधान दिन ते 06 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व आयोजित करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कार्यालयात समता पर्वाचा आज समारोप करण्यात आला..!
यावेळी, एम. एस. मुळे, एस. जे. रणभिरकर, व्ही. बी. आडे, बी. एम. शिरगिरे, संजय पाटील, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, बाबू कांबळे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होनवडकर, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे, मोशीन शेख, संजय मंत्रे लहानकार , रयत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष इरवंत सूर्यकार यांची उपस्थिती होती..!