एक बी.एच.एम.एस. दोन नरसिंग आणि एक इंजिनिअरिंगसाठी निवडले
हिमायतनगर| हिमायतनगर शहरातील मार्कण्डेय मल्टी सर्विसेस अँड एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या तीन विद्यार्थ्यांची एम.बी.बी.एस.साठी निवड झाली असून, हिमायतनगर शहरात अल्पावधीतच नावा रुपाला आलेले मार्कण्डेय मल्टी सर्विसेस अँड एज्युकेशन कन्सल्टन्सी हे परिपूर्ण प्रवेश प्रक्रिया प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांचे प्रेरणास्तव ठरले आहे.
मार्कण्डेय मल्टी सर्विसेस अँड एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या माध्यमातून मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतलेली अनेक विद्यार्थी एम.बी.बी.एस., बी.एच.एम.एस., बी.एस. नरसिंग आणि बी. इ. इंजिनियर या शिक्षणासाठी निवडल्या गेले आहेत. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचे नुकतेच संचालक काशिनाथ गडमवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यामध्ये एम.बी.बी.एस. साठी पात्र ठरलेले विद्यार्थी संघपाल आनंदराव तुळसे, दिशा बसवंत कपाळे, रोशन ज्ञानोबा वानोळे, तर बी.एच.एम.एस. साठी राधा संतोष बेटेवाड यांची निवड झाली आहे. तसेच बी.एस.सी. नर्सिंगसाठी समता मारोती हनवते, पूजा बाबुराव राठोड आणि बी.ई. इंजीनियरिंगसाठी योगेश गजानन वारकड यांची निवड झाली आहे. या सर्वांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील शिक्षणासाठी हे सर्व विद्यार्थी संबंधित महाविद्यालयात प्रवेश करून शिक्षण घेत आहेत. या सर्वांना पुढील शैक्षणिक वर्ष लाभदायक ठरो आणि जनसेवा करण्याची संधी त्यांना मिळो अशा शुभेच्छा मार्कण्डेय मल्टी सर्विस अंड एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या शिक्षणासाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हिमायतनगर शहरातील शिक्षण प्रेमी नागरिक आणि विद्यार्थी वर्गातून अभिनंदन केले जात आहे.