भोकरमध्ये 15 डिसेंबर रोजी ओबीसी सन्मान मेळावा; प्रा.लक्ष्मणराव हाके यांचे व्याख्यान होणार-NNL


भोकर।
ओबीसी बांधवांच्या विविध समस्या, त्या बरोबरच निर्माण झालेली आरक्षणाबाबतची संदिग्धता, ओबीसीचे संघटन मजबूत करणे, गावागावातील ओबीसीना आपल्या न्याय हक्काची जाणीव करून देणे, हा विचार पुढे ठेवून भोकर येथे दि.15 डिसेंबर 2022 रोजी ओबीसी सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मणराव हाके यांचे व्याख्यान होणार आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता, जातनिहाय जनगणना करणे, इम्पेरियल डाटा देणे, याबाबत दाखवण्यात आलेली निराशा जनक भूमिका, न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसींचे आरक्षण जाणे, त्यानंतर पुन्हा न्यायालयाच्या आदेशाने ओबीसींचे आरक्षण सद्यस्थितीत टिकले असले तरी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते या सर्व बाबींचा विचार करून भोकर तालुक्यात गावागावात असलेल्या ओबीसींना जागृत करण्यासाठी, ओबीसींच्या आरक्षणाबाबत निर्माण झालेली किचकट परिस्थिती, राजकीय आरक्षण, शैक्षणिक आरक्षण, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात निर्माण होणाऱ्या अडचणी ह्या सर्व बाबी समजून सांगण्यासाठी सर्वपक्षीय ओबीसीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तालुका भरातील ओबीसींचे ग्राम पंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, शालेय समितीचे अध्यक्ष, इतर मान्यवर मंडळी यांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मणराव हाके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. दि. 15 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता ओम लॉन्स भोकर येथे होत असलेल्या ओबीसी सन्मान मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे. सकाळी ९ वाजता मोटार सायकल रॅली उमरी बायपास रोड येथून निघणार आहे. त्यामध्ये सुद्धा सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भोकर तालुका ओबीसी समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी