नांदेड। नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची बृहन्मुंबई अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नांदेड परिक्षेत्रामध्ये मागील अनेक वर्षापासून कार्यरत असलेले निसार तांबोळी यांनी पोलीस प्रशासनाला शिस्त आणि वळण लावण्याचे कार्य प्रभावीपणे केले आहे. त्यांच्या काळात नांदेड परिक्षेत्रामध्ये पोलीस प्रशासनाने उत्कृष्ट असे कार्य केले आहे. अडीच वर्षापासून नांदेड परिक्षेत्राचा कारभार पाहताना प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या अत्यंत कठीण अशा खुनाचा त्यांनी उलगडला केला आणि आरोपींना अटक करून मोक्का लावला आहे.
नुकतेच भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमध्ये निसार तांबोळी यांची बृहन्मुंबई येथे वाहतूक शाखेचे अपर आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तसेच नांदेडचे भूमिपुत्र नवीनचंद्र रेड्डी हे आता अमरावती शहराचे पोलीस आयुक्त असणार आहेत. तेथील आरतीसिंह यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. राज्यातील पोलीस आयुक्त, सहआयुक्त पदाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने आज मंगळवारी काढले आहेत. राज्यातील पुणे, नाशिक, नवी मुंबईसहित अनेक शहरातील पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.
सदानंद दाते यांची राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहेत. तर विश्वास नांगरे पाटील व निकेत कौशिक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालक मुंबई पदी नियुक्ती झाली आहे. मिलिंद भारंबे यांची नवी मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विनयकुमार चौबे यांची पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.
अमिताभ गुप्ता यांची अप्पर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्यपदी नियुक्ती झाली आहे. नवीनचंद्र रेड्डी यांची अमरावती पोलिस आयक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर मुंबई गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस दी ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने त्यांच्यासह पोलीस प्रशासनातील वरिष्ठ पंधरा अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.