विद्युत प्रशासनाने ग्रामस्थांना संवेदनशिलतेने सेवा देण्याची गरज -NNL


आपला भारत देश हा खेड्यांनी बनलेला आहे. लाखो खेडी भारतामध्ये आहेत. खेड्यातील माणवी जिवन हे शेतीवर अवलंबून असल्यामुळे शारिरीक कष्ट करुन आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह गावकरी मंडळी करुन जिवन जगतात. ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास  होतो. खरे माणवी जीवन बघायचे असेल तर गावात राहणार्‍या गावकरी आणि शेतकर्‍यांचे जिवन बघा. असेच गावकर्‍यांंच्या जिवनाकडे संवेदनशिलतेने बघून त्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी शासन-प्रशासनाने गावाकडे जावे असे आवाहन महात्मा गांधींनी गावाच्या विकासासाठी केले होते. 

आजही गावामध्ये मोठ्या प्रमाणात गरीबी, दारिद्र्य, नागरी सुखसुविधांचा अभाव असल्याचे जाणवते. शासन गावाच्या विकासासाठी अनेक योजना राबविते. त्या योजनांची अंमलबजावणी करुन प्रत्यक्ष गावकर्‍यांपर्यंत त्या सुविधा पोहचविण्याचे काम प्रशासनाचे असते. कृषि, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम आदी विभाग गावकर्‍यांना जिवनावश्यक सुविधा पुरविण्याचे प्रयत्न करतात. माणवी जिवनासाठी अन्न, वस्र, निवारा, आरोग्या आणि शिक्षण ह्या मुलभूत गरजा माणल्या जातात. ह्या मुलभूत गरजांची पुर्तता करण्याचे कर्तव्य शासन प्रशासनाने पार पाडुन माणवी जिवन सुखी समाधानी करण्याचा प्रयत्न केला जातो. या पाच मुलभूत गरजांबरोबरच आता विजपुरवठा हि एक मुलभूत गरज झाली आहे. माणवी जिवनामध्ये विजेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. 

लाईट नसल्यास सर्व माणवी जिवन विस्कटुन जाते. घरगुती प्रकाशासोबतच शेती, उद्योगासाठी विज हि अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु हा विजपुरवठा करत असताना विद्युत प्रशासनाकडून मात्र शहरी भागातील ग्राहकांना विजपुरवठा सुरुळीत केला जातो. तर ग्रामीण भागातील जनतेला विजपुरवठा त्या तुलनेत योग्य प्रकारे होत नाही. ग्रामीण भागातील विजपुरवठा सतत खंडित होत राहतो. बर्‍याच वेळेस कमी दाबाचा विद्युत  पुरवठा करुन ग्रामीण जिवन अडचणीत आणले जाते. रात्री-अपरात्री विजपुरवठा खंडित झाल्यामुळे गावकर्‍यांना अनेक समस्यांचा सामना करावाागतो.पिठाची गीरणी, पिण्याचे पाणी, शेतीपंपासाठी पाणी, मोबाईल चार्ज करण्याठी, टि.व्ही. मनोरंजनासाठी विद्युत पुरवठ्याची आवश्यकता ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये विद्युत विभागाकडून मागणीनुसार विजपुरवठा केला जात नाही. 

कारण विजपुरवठा सुरळीत होण्यासाठी विजबिल भरणे आवश्यक असते आणि हे विजबिल ग्रामीण भागातील जनतेकडून वेळेवर भरले जात नाहीत त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अखंडित विजपुरवठा करता येत नाही असे विद्युत विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांतुन बोलले जाते. परंतु गावकर्‍यांचे उत्पन्न हे अल्प प्रमाणात असते. शेती आणि शेतमजुरी करुन ग्रामीण समाज जिवन जगत असतो. त्यामुळे त्यांच्याकडे शहरी भागातील जनतेसारखे नित्य नियमाने आर्थिक उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता तात्काळ विद्युत बिल भरु शकत नाही. परंतु त्यांना थोडी सवलत आणि शेतातील पिकाच्या हंगामानुसार विजबील भरण्याची सुविधा करुन दिली तर गावकरी आपल्याकडील विजबील भरु शकतात. 

परंतु त्यांच्याकडून विजबिल वेळेवर भरल्या जात नाही म्हणून त्यांचा विजपुरवठा खंडित करणे किंवा, कमी दाबाचा करणे हे मानवाधिकाराच्या नियमात बसत नाही. विजबिले गावकरी वेळेवर भरत नाहीत म्हणून विजवितरण प्रशासनाकडून गावकर्‍यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा परिणाम गावकर्‍यांच्या जिवनमानावर आणि त्यांच्या विकासावर होत आहे. गावकर्‍यांना अखंडित विजपुरवठा चालु ठेवावा म्हणून गावकरी शासन-प्रशासनाकडे सतत टाहो फोडत असल्याचे दिसून येते. प्रत्येक गाकर्‍यांच्या विज वितरणाबाबत तक्रारी आहेत. अलिकडे नियमित विजबिल भरुनही विद्युत ट्रान्सफर जळाले, वादळ वार्‍याने विजतारा तुटल्या, पोल पडले, साहित्य आले  नाही, ट्रान्सफरचा तुटवडा आहे अशी कारणे सांगुन गावामध्ये विद्युत विभागाकडून विजपुरवठा केला जात नाही. प्रशासनाच्या इतर विभागातील कर्मचारी मात्र आपली सेवा देताना अशी कोणतीही कारणे सांगत नाहीत. 

परंतु विद्युत विभागातील अधिकारी कर्मचारी अशी विविध कारणे सांगुन ग्रामीण भागातील विजपुरवठा नियमित आणि अखंडित ठेवण्यात चालढकलपणा करतात. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील जनतेचे जिवनमानावर होतो. गावामध्ये सततचा विजपुरवठा खंडित होत आहे तो सुरुळीत करण्यात यावा म्हणून हिमायतनगर तालुुक्यातील कार्ला येथील गावकर्‍यांनी हिमायतनगर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासत वेळोवेळी अखंडित विजपुरवठा देण्यात यावा म्हणून मागणी केली परंतु  तेथील विजपुरवठा काही अखंडित राहत नव्हता. तसेच रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी सुध्दा विज मिळत नव्हती. त्यामुळे गावामध्ये पिठाची गीरणी बंद होती, पिण्याचे पाणी गावकर्‍यांना मिळत नव्हते तसेच गाव आठ दिवसांपासून अंधारात होता. त्यामुळे शाळेतील मुलांच्या शिक्षणावरसुध्दा या खंडित विजपुरवठ्याचा परिणाम होता म्हणून विजेअभावी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंत्याचे कार्यालय गाठुन त्यांना विजपुरवठा सुरुळीत करण्याच्या मागणीसाठी गावकरी गेले परंतु सदरील कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता तसेच उपविभागीय अभियंता हजर नसल्यामुळे आपली तक्रार कोणाकडे द्यावी आणि आपला विजपुरवठा आजही मिळणार नाही म्हणनू कार्ला येथील खंडू कांबळे या शेतकर्‍याने सोबत असलेले किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

परंतु ही बाब हिमायतनगर चे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांना एका शेतकर्‍याने तात्काळ सांगितली आणि लगेच आ. जवळगावकरांनी खंडू कांबळे ह्या शेतकर्‍यास समजावून सांगितल्यानंतर त्याने विष पिण्याचा निर्णय मागे घेतला आणि पुढील अनर्थ टळला. जर हि घटना घडली असती तर या शेतकर्‍याच्या कुटुंबावर किती वाईट वेळ आली असती. अशा प्रकारे सर्वच ग्रामीण भागातील ग्रामस्थ हे विज वितरण विभागाच्या कामाविषयी असतुष्ट आहेत. त्यासाठी विज वितरण विभागाने शहरी भागाप्रमाणेच  गावकर्‍यांनाही संवेदनशिलतेने सेवा देवून त्यांच्या जिवनमानात बदल घडवून आणन्यायासाठी पराकाष्ठा करण्याची गरज आहे. तरच ग्रामीण  भागातील जनता आपले कष्टदायक जिवन जगत आपला आणि आपल्या मुला-बाळांचा विकास करु शकेल.

लेखक - भैय्यासाहेब तुकाराम गोडबोले, रा. जवळा ता.लोहा जि. नांदेड, मो.९०११६३३८७४

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी