नागरिकांनी शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा- डाॕ.शर्मा
नांदेड। आजच्या धावपळीच्या युगात नागरिक आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करित असल्यामुळे आजार वाढत असतात.अश्या सर्व आजारावर मोफत उपचार करण्या करिता केंद्र शासनाने आयुष्यमान भारत प्रधानमंञी जन आरोग्य योजना आणि महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबाराव फुले जन आरोग्य योजना या दोन प्रमुख योजना शासनाने सर्वं नागरिकांसाठी नांदेड शहरातील ३३ अंगीकृत दवाखान्यांतून मोफत आरोग्य तपासणी व १२०९ विविध आजारावर उपचार केले जातात.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शासनाच्या या आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा व ईतरांनाही त्याचा लाभ मिळवून द्यावा असे प्रतिपादन आयुष्यमान भारत प्रधानमंञी जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डाॕ.दिपेशकुमार शर्मा यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त अल ईम्रान प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आयोजित, एम.डी.जमाल प्रस्तुत फ्रेंड्स म्युजीकल नाईट आर्केस्ट्रा "एक शाम देश के एकता के नाम" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन डॉ शंकरराव चव्हाण सभागृहात दि.५ डिसेंबर२०२२ सोमवारी सांयकाळी आयोजित करण्यात आले होते. डाॕ.शर्मा या कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात सामुहिकपणे संविधान वाचनाने करण्यात आली.संविधानचे वाचन पञकार तथा आकाशवाणी चे उत्कृष्ट निवेदक राम तरटे यांनी केले.तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नांदेड अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष निखिलभाऊ लातूरकर, नगरसेवक मुन्तंजबोद्दीन,रा.यु.काँ.चे शहराध्यक्ष रऊफ जमिनदार,नांदेड जिल्हा मराठी पञकार परिषदेचे लक्ष्मण भवरे, मतलूभाई गोंदवाले,डॉ. शंकारराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अभ्यागत मंडळाचे सदस्य अब्दुल हबीब,पत्रकार हैदर अली, संपादक नईम खान,आदिं उपस्थित होते.
डाॕ.शर्मा पुढे म्हणाले कि अल ईम्रान प्रतिष्ठान हि संस्था नांदेड शहरातील विविध प्रभागात शासनाच्या आरोग्य योजनेबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन शिबिर घेत आरोग्य योजनांचा प्रचार,प्रसार उत्कृष्ट पध्दतीने करित असल्याचे डाॕ.शर्मा यावेळी म्हणाले.कार्यक्रमात विविध देशभक्तीपर व चिञपटाचे गाने एम.डी.जमाल यांच्या समुहाने गायन केले.प्रास्ताविक करताना प्रतिष्ठानचे संचालक ईंजि.ईम्रान खान म्हणाले कि संस्था गेल्या अनेक वर्षापासून शहर व जिल्ह्यात व्यसनमुक्त भारत सशक्त भारत हा उद्देश समोर ठेवून व्यसनमुक्त अभियान राबवत असल्याचे सांगितले.
सुञसंचलन अनवर पाशा,सय्यद हुसेन यांनी केले.तर आभार सुभाष मद्देवाड यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपादक फेरोज खान,शेख नाजीम,मिर्झा आजम बेग,मिलींद सोनसळे, ईंजि.गजानन कानडे,सिंगर सय्यद जमील, मौजम पठाण, जमील चाऊस, शेख अलीम, शेख सिराजोद्दीन, सौ.ललिता डुलगच, कु. वर्षा दारा सौदे, रिजवान शेख, अब्दुल अजीम, सर आदिंनी परिश्रम घेतले.