नांदेड| महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी )पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी )- २०२२ परीक्षेत नवीन नांदेड कौठा येथील कच्छवेज् गुरुकुल स्कूल मधील विध्यार्थीनी नेत्रदीपक यश मिळवत विद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
इयत्ता ५ वी व ८ वी ला प्रविष्ट असणान्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अशा प्रकारची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करीत असते. कौठा नवीन नांदेड परिसरातून दरवर्षी इतक्या मोठ्या संख्येने शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी कच्छवेज् गुरुकुल स्कूल मधील असल्याने पालकवर्गात मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत असल्याचे चित्र दिसत आहे.
इ.5 वी मधून कैवल्य टाक, वेदांत गोरे व तेजस लोध तर इ.8वी मधून अदिती मुरकुटे, दिपक चव्हाण व बालाजी बकाल हे सहा विध्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत तरी यशस्वी विध्यार्थीचे अभिनंदन शाळेचे संचालक तथा ज़िल्हा समुपदेशक श्री. बालासाहेब कच्छवे, सचिव श्री आदित्य कच्छवे, मुख्याध्यापिका सौ. दुर्गादेवी कच्छवे, उपमुख्याध्यापक श्री सचिन वसरणीकर, प्रशांत बारादे, शिला अनंतवार, शिल्पा कतेवार, मीरा बाचेवाड, उषा किनकर, आबासाहेब शिशोदिया, भाग्यश्री तेहरा, सुनीता सावते , मुरकुटे सीमा,पूजा कट्टेवार, परदेशीं सुजाता,सुनीता लोध, भाग्यश्री पडलवार, कांबळे, व गायकवाड आदी शिक्षकवृंदानी व शाळेतील इतर पाल्याच्या पालकांनी केले आहे.