लोहा| पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त सह्याद्री प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय पारडी या शाळेमध्ये बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमला अध्यक्षस्थानी सह्याद्री शाळेच्या संचालिका जयश्री शिंदे, या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून साईकुमार दहिवाळ, मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक नागेश हिरास, सह्याद्री इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नंदकिशोर मेकाले हे मान्यवर उपस्थित मान्यवरच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले शाळेतील सहशिक्षक संजय देशुमख यांनी कार्यक्रमाची सुरुवात बाल गीतांनी केली.
विध्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर मुलांची भाषणे झाली. सूत्रसंचालन श्रुती जोडराणे, अविष्कार मोरे (वर्ग 9 वा) या विद्यार्थ्यीनीने केले तर देवनंदिनी दुधाटे, धनश्री देवकर यांनी बालदिनाची कविता सादर केली. भाषण स्पर्धेचे परिक्षक अझहर शेख य केले. कार्यक्रमाचे नियोजन अनुपमा कोलते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षककेत्तर कर्मचारांनी सहकार्य केले.