नांदेड| ‘राडा’ या मराठी चित्रपटात बाल कलाकाराची भूमिका साकारलेल्या मार्तंड रमेश पांडे याचा बालदिनाचे औचित्य साधून प्रतिभानिकेतन शाळा श्रीनगर येथे सर्व शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रतिभा निकेतन श्रीनगर शाळेत इयत्ता नववीत शिकणारा मार्तंड हा राडा चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत आहे. बाल दिनानिमित्त सोमवार दि. 15 नोव्हेंबर रोजी शाळेत झालेल्या कार्यक्रमात त्याला गौरविण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनघा कुरुमभट्टे. उपमुख्याध्यापक ढवळे, पर्यवेक्षक अरुण मुदलकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.