नांदेड| येथे कुसुम सभागुहात सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत १७ नोव्हेंबर रोजी विनोद डावरे लिखित, ऐश्वर्या डावरे दिग्दर्शित “चिरंजीव” हे नाटक झपूर्झा सोशल फौंडेशन परभणीच्या वतीने सादर झाले.
पुराणातल्या कथा किंवा दंतकथा खर्या असल्याच्या मानल्या जातात. त्या पुराणात सात व्यक्ती या अमर किंवा चिरंजीव मानल्या गेल्या किंवा तशी मान्यता प्राप्त आहे. या सात चीरंजीवांवर आधारित कथा म्हणजे “चिरंजीव” हे नाटक होय.
नाटकाच्या सुरवातीला एक मुलगी आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून रंगमंचावर येते. तिथे तिची भेट होते ती या सप्त चीरंजीवांशी. तिचे रक्षण करायचे म्हणून एक एक जन एक एक तास वाटून घेतात. या प्रत्येका सोबतच्या एकांतात ती मुलगी ते चिरंजीव असल्याचे त्यांच्याच तोंडून वदवून घेते. आता ती मुलगी म्हणजे नेमक कोण? हे नाटक पाहताना स्पष्ट होते.
या नाटकाच रेणुका कानडे यांनी आपला आवाजाची पोत, उच्चारण, भावना, यांचा मेळ करत साकारलेली मुलीची भूमिका लक्षवेधी ठरली. तर रवी- महेश देशमुख, सोम- महेश जोशी, मंगळ- सागर सुडके, बुध- रघुनंदन काळे, गुरु- स्वराज पवार, शुक्र- पृथ्वीराज देशमुख, शनी- अमोल गोरकट्टे, सहकलाकार – वेभाव शेटे, अमघ जोशी, वेश्नावी झटे, अर्जुन देशमुख यांनी आप आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
प्रकाशयोजना- सुस्मिता देऊळगावकर, नेपथ्य- संकेत गाडेकर, संगीत – मोहन भाले, रंगभूषा भानुदास जोशी, वेशभूषा- सुभाष जोशी, रंगमंच व्यवस्था- संपत्ती डावरे, गौतम धोडके यांनी सांभाळली. दि. १९ नोव्हेंबर रोजी राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, अनुजा डावरे दिग्दर्शित “दुसरा अंक” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.