नविन नांदेड। असदवन ता.जि.नांदेड येथे अखंड दतनाम सप्ताह व दत्तमुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता सप्ताह सुरुवात होणार असुन रात्री 9 वाजता आंंनद दत्त महापुजा आयोजन करण्यात आले आहे.
या अखंड दतनाम हारिनाम सप्ताह मध्ये 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता पालखी मिरवणूक व 11वाजता मुर्तीच्यी स्थापन गुरुवर्य रूद्रगिर महाराज किवळेकर,यांच्ये प्रवचन , अन्नदान व रात्री सव्वा मन तांदळाच्यी आंंनद दत्त महापुजा होईल व सकाळी 4वाजता परज्ञानी भुपाळी व 29रोजी सकाळी काकडा आरती ने कार्यक्रम सांगता होईल.या सोहळ्याला गुरु समगिरी गुरू जयगिरी महाराज,श्री दत्तगिरी गुरू आंनदगिरी महाराज,श्री गुरु रूद्रगिरी गुरू,दयाळ गिरी महाराज, श्री देवगिरी काचनगिरी महाराज यांच्यी उपस्थिती राहणार आहे.
या महापुजेला अनेक गावातील भजनी मंडळ सहभागी होणार असून भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी असदवन यांनी केले आहे.