उस्माननगर। येथून जवळच असलेल्या मौजे दाताळा ता.कंधार येथील बळवंत विनायक बोदेमवाड यांनी नुकत्याच पार पडलेल्या नेट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
बळवंत बोदेमवाड यांनी परिक्षेस मानववन शास्त्र हा विषय घेऊन पहिल्याच प्रयत्नात नेट परिक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. बळवंत बोदेमवाड यांनी यशाचे श्रेय आई, वडील व गुरुवर्य यांना दिले आहे.त्यांच्या या यशाबद्दल समता विद्यालयाचे मुख्याध्यापक काका गोविंदराव बोदेमवाड , काका डॉ.उत्तमराव बोदेमवाड यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक,मित्रांनी अभिनंदन केले आहे.