नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्रात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिवाळी अंकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रदर्शनात मेहता ग्रंथजगत, ग्रहसंकेत, ऋतुरंग, मनोकल्प, आरोग्यदीप, शामची आई, रुचकर, महानुभाव, चांगुलपनाची चळवळ, हंस, लोकमत, मेनका, मनशक्ती, लोकसत्ता, श्री व सौ, संवाद सेतू, भन्नाट, गुंफण, अन्नपूर्णा, लोकप्रभा, अपेक्षा, माहेर, गृहलक्ष्मी, रुपेरी, पद्मगंधा, जत्रा, एबीपी माझा, अक्षरमुद्रा, साहित्य चपराक, दुर्गाच्या देशातून, उत्तम अनुवाद, अक्षर, धनंजय, शब्दालय, साहित्य शिवार, वसुधा, निनाद, अक्षरज्ञान, सुवासिनी, शब्दशिवार, समतोल, अक्षरवेध, श्यामसुंदर, योगासने, अनुराग, रागिणी, नवलकथा, प्रपंच, नवल, गोंदण, पर्यटन आणि पर्यावरण, मानिनी, आरोग्यम, मौज, साधना इ. दिवाळी अंक प्रदर्शित करण्यात आले.
या कार्यक्रमास नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, औषधनिर्माणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, अरुण धाकडे, संजयसिंह ठाकूर, उद्धव हंबर्डे, गोविंद हंबर्डे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, पुणे येथील एफटीआयआयचे डॉ. मिलिंद दामले, डॉ. अनुराधा पत्की आदिनी प्रदर्शनास भेट देउन आनंद व्यक्त केला.
प्रा. डॉ. केशव देशमुख यांनी विविध दिवाळी अंकांची वैशिष्ट्ये सांगितली तर प्र. संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अरुण हंबर्डे, विठ्ठल मोरे, संदीप डहाळे, के. एस. सिद्दिक़ी, मोहनसिंग पुजारी, दयानंद पोपळे, योगेश हंबर्डे, जीवन बारसे यांनी परिश्रम घेतले.