नवीन नांदेड। जनता शिक्षण प्रसारक मंडळ, उमरदरी संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,सिडको येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी दोन गटात निबंध स्पर्धा घेण्यात आली तर शाळा परिसरातुन मुख् रोडने भव्य राली काढण्यात आली.
शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष रवी शिवाजीराव जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य प्रा.व्ही.के. हंगरगेकर,पर्यवेक्षक एन.एम.भारसावडे, समन्वयक प्रा.एस.एम देवरे, व्ही.एस.वाघमारे, सौ.के.पी. पल्लेवाड, डी.जी.पवार उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण केला. यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेते (इयत्ता ५ वी ते ७ वी गट)कु.मळगे शिवांगी अशोक ( प्रथम), कु मगर साक्षी शिवाजी ( द्वितीय) व (इयत्ता ८ वी ते १० वी गट) कु. शिंदे पल्लवी हानमंतराव( प्रथम), कु. मारे ऋतुजा मोहन (द्वितिय) यांना संस्थेचे उपाध्यक्ष रविसाहेब जाधव यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यानंतर एन.सी.सी च्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात शालेय विद्यार्थ्यांनी संविधानातील मानवी मूल्यांचा जागर प्रत्येक व्यक्तिपर्यंत व्हावा या उद्देशाने विवीध देखावे सादर करत भारतीय संविधानासह सिडकोतील मुख्य रस्त्याने भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी माध्यामिक व उच्च माध्यामिक शाळेतील सर्व शिक्षक प्राध्यापक व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ए . जी देगावकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर कापसे,विठठ्ल शिंगणवाड ,रामराव विजापुरे यांनी विशेष प्रयत्न केले.