नवीन नांदेड। भायेगाव ग्रामपंचायत येथे पंधराव्या वित आयोगातुन स्मशान भुमि परिसरात पेव्हर बसविण्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आला असून, गावातील हर घर नळ पाणीपुरवठा योजना, पांदण रस्ता यासह अनेक कामे प्रगती पथावर असल्याचे संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत संरपच सौ. सविता बालाजी पाटील भायेगावकर , बालाजी पाटील कोल्हे उपसरपंच, ऊर्मिला शंकर खोसडे, शिवाजी खोसडे, साईनाथ यनावार, आशा भालेराव ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने व वेळोवेळी विविध विकासात्मक कामा साठी सहकार्य करणारे ,गट विकास अधिकारी मुकावार ,अभियंता घोडके ,राजे , विस्तार अधिकारी मांजरमकर ,ग्राम विकास अधिकारी एस एस वाकोरे यांच्या पुढाकाराने १५व्या वित आयोगाचा निधीतून जिल्हा परिषद शाळेला व अंगणवाडी कंपाऊंड वॉल रंगरंगोटी, स्मशानभुमी येथिल हात पंपाच्या भोवती फेवर बसवुन सुशोभीकरण, पाणी पुरवठा साठी पाईप लाईन ही सर्व कामे १५ व्या वित आयोगातु नियोजन बद्ध आम्ही सर्वांनी मिळुन ही कामे सर्व गावकऱ्यां साठी उपयुक्त व हिताचे काम केले आहेत.
आरोग्य उपकेंद्र काम प्रगतीपथावर असल्याचे सांगून लवकरच जलजिवन योजना अंतर्गत हर घर नळ योजना अंतर्गत पाणी पुरवठा व दोन किलोमीटर पांदन रस्ता लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले असुन माझे गाव सुंदर गाव हि कल्पना साकारली जात आहे.