नविन नांदेड। आई-वडीलांची सेवा करा, निर्व्यसनी व्हा व जिवनात आंंनद घ्या,असा उपदेश प्रवचनातून उपस्थितीत भाविक भक्तांना ह.भ.प.गुरू रूद्रगिरी महाराज यांनी असदवन येथील अंखड हारिनाम सप्ताह व दत्तमुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या प्रंसगी केले.
असदवन ता.जि.नांदेड येथे अखंड हारिनाम सप्ताह व दत्तमुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन २२ ते २८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी गावातुन पालखी मिरवणूक व ११.११ मिनिटांनी दत्तमुर्ती मुर्ती स्थापना करण्यात आली, यावेळी गुरुवर्य रूद्रगिर महाराज किवळेकर यांनी, संत श्रेषठ ज्ञानेश्वर माऊली, संत तुकडोजी महाराज यांनी दिलेल्या अनेक उदाहरणे सांगितले, युवकांनी निर्व्यसनी व्हा,आई वडीलांची सेवा करा, गुरू महाराज यांची सेवा करा, असा उपदेशही प्रवचनामधुन उपस्थित भाविकांना दिला.
श्री गुरु समगिरी महाराज, श्री गुरु गिरी महाराज, श्री गुरु दत्तगिरी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने, हा अखंड हारिनाम सप्ताह आयोजित केला होता. दि. २८ नोव्हेंबर सोमवार सकाळी ९ ते ११ पालखी मिरवणूक व ११.११ मि. श्री दत्त मुर्तीस्थापना झाली ऊपसिथीत गुरूवर्य यांच्या ऊपसिथीत झाली , तर रात्री सव्वा मन तांदळाची आनंददत्त महापुजा व पहाटे ४ ते ६ परज्ञानी भूपाळ्या व २९ नोव्हेंबर २०२२ रोजी मंगळवारी सकाळी काकडा आरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे,या सोहळ्याला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनरावजी हंबर्डे, मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, भाजयुमोचे शहर महानगर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, मारोती घोरबांड, साईभक्त गणेश जैस्वाल यांच्यासह सिडको, हडको, गोपाळचावडी, वाघाळा व असदवन परिसरासह ग्रामीण भागातील ग्रामस्थ भाविक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचा लाभ ऊपसिथीत भाविक भक्तांनी घेतला. हा अंखड दतनाम सप्ताह व दत्तमुर्ती प्राणप्रतिष्ठा स्थापन सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त गावातील मंडळीनी परिश्रम घेतले.