महात्मा फुले महाविद्यालयाकडून विरभद्र यात्रेनिमित्त शिरणी वाटप -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
शहरातील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाकडून विरभद्र यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शिरणी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात उत्कृष्टपणे महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे समाधान व्यक्त करीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी. अडकिणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . बी.एस.एफ.मध्ये  महाविद्यालयाचा शिकारा येथील माजी विद्यार्थी शेळके सोमेश्वर किशनराव याची निवड झाल्यामुळे त्याचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

नरसी रोडवरील महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणातून शोभायात्रा निघून शहरातील मुख्य बाजारपेठेतून विरभद्र मंदिरात बँड पथकासह संस्थेचे संचालक श्रीकांत पाटील हंगरगेकर, सुभाषअप्पा शिवपुजे, रणजित पाटील हंगरगेकर, ओंकारअप्पा मठपती, मा.प्राचार्य शंकरराव बसापूरे, मा.प्राचार्य ज्ञानोबा वंजे, शिवराज पाटील हंगरगेकर, संजय गोंड, पांडूरंग चमकुरे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते, अधिक्षक एस.के.सुर्यवंशी, प्रा.सी.बी.साखरे , प्रा.डॉ. डी.के.आहेर, प्रा.डॉ. एम.के.राऊत, प्रा.डी.बी.साखरे, प्रा.जी.एम.वायफणकर, प्रा.बी.जी.पावडे , प्रा.एस.पी.अग्रवाल आणि इतर सर्व वरिष्ठ ,कनिष्ठ व व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी