निष्ठावंत नवतरुण युवकांना संधी दिल्यास काँग्रेस पक्षाला बळकटी येईल - डॉ. रणजित काळे -NNL

▶️डॉ. रणजित काळे यांचे खा.राहुल गांधी यांच्याकडे साकडे

▶️ काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांच्या गोठ्यात धडकी भरल्याची चर्चा ..!


मुखेड, रणजित जामखेडकर|
देशात काँग्रेस पक्षाला उभारी घेऊन पुन्हा काँग्रेसची एकहाती सत्ता आणायची असेल तर प्रस्थापितांना बाजूला सारुन नवतरुणांन निष्ठावंतांना संधी द्यावी अशी मागणी युवक कॉंग्रेसचे मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघाचे युवक कार्याध्यक्ष डॉ.रणजित काळे यांनी काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्याकडे नरसी नायगांव येथील भारत जोडो यात्रे दरम्यान आपल्या मागणीचे साकडे घातले .

खा. राहुल गांधी हे देगलुर मार्गे नांदेड जिल्हयाच्या दौयावर असतांना . मागील तीन दिवसापासुन नांदेड मध्ये विविध ठिकाणी त्यांनी काॅर्नर सभा सुध्दा घेतली तर पदयात्रे दरम्यान अनकांना ते भेटले सुध्दा आहेत. यात समाजातील प्रत्येक घटकातील घटकांना खा. राहुल गांधी भेटुन सुसंवाद साधत आहेत. यापूर्वी देशात काँग्रेसची सत्ता असतांना देशातील जनतेला अशा महागाईने, बेरोजगारीनी कधीही ग्रासले नव्हते पण सध्या देशात महागाई आणी बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली असुन गोर गरीबांचे जगणे सुध्दा मुश्कील झाले आहे . 

अशा परिस्थितीत देशातील जनता मोदी सरकारवर नाराज आहे पण याचा फायदा काँग्रेसला घेता येत नसल्याची परिस्थिती आहे सर्वत्र प्रस्थापितांनी तळ धरला आहे. सर्व सामान्य युवकांना , निष्ठावंताना हे प्रस्थापित समोर जाऊ देत नाहीत त्यामुळे काँग्रेसमध्यली प्रस्थापितशाही व व्हिआयपीशाही बाजूला सारुन नवतरुणांना संधी दिल्यास कॉग्रेस पुन्हा एकदा देशात आपले सरकार स्थापित करु शकते असे डॉ. रणजित काळे यांनी खा . राहुल गांधी यांच्या लक्षात आणुन दिले दरम्यान खा . राहुल गांधी यांनी आपल्या या सुचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे डॉ .काळे यांनी दैनिक गाववालाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

डॉ . रणजित काळे हे मुखेड तालुक्यातील खरब खंडगांव येथील नवतरुण सरपंच आहेत तर तालुक्यासह मुखेड ,कंधार , देगलुर बिलोली नायगांव या तालुक्यातही त्यांचा मोठा जनसंपर्क आहे . काँग्रेसमध्ये योग्य व्यक्तीला व काम करणाऱ्या निष्ठावंताना न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची अगोदर पासुनच भूमिका राहिलेली आहे. दरम्यान खा . राहुल गांधी हे नांदेड दौ - यावर भारत जोडो यात्रेत असल्याने त्यांच्या मनातील खंत त्यांनी बोलून दाखवली तर खा . राहुल गांधी यांना भेटण्यासाठी , माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहकार्य केल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले .

 भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून खा. राहुल गांधी यांच्या यात्रेत संवाद साधण्याची संधी दिली . मुखेड तालुक्यात मरगळलेल्या काँग्रेसमध्ये आपण जीव फूंकत असल्याचे सांगून प्रस्थापीतांना सोडून नव्या लोकांना संधी मीळाली तरच काँग्रेस यशस्वी होईल आपल्याकडे पाहून नवतरुणांमध्ये प्रचंड अकर्षण निर्माण झाले आहे याची आपण नोंद घेवून पक्षात जयपुर अधिवेशनात संघटनेतील बदला बाबत झालेले निर्णय अंमलात आणावेत अशी विनंती केली असता राहूलजींनी यापूढे पाच वर्षापेक्षा जास्त काळ एक्या पदावर एक व्यक्ती यापूढे राहणार नसल्याचे सांगून नव्यांना संधी मिळेल असा विश्वास दिला. लढते रहो आगे समय आयेगा अपना धीरज रखो असा संदेश दिला. खरोखरच मला खुप आनंद झाला धन्यवाद राहूलजी आपण आमचे मनोगत जाणुन घेतले आपुलकीने धीर दिलात. आम्ही पक्षासाठी तन - मन - धन लावून लढा उभारु अशी उमेद मिळाली. डॉ. रणजीत काळे, युवक काँग्रेस कार्याधक्ष, मुखेड - कंधार विधानसभा

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी