नांदेड/उमरी। आपले घर गाव आणि देश स्वच्छ आणि समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे त्यामुळे शासनाच्या स्वच्छता अभियानाला आपण सहकार्य करावे तसेच प्लॅस्टिक मुक्त भारत करण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन भागवताचार्य प्रशांत महाराज खानापूरकर यांनी केले.
मौजे सिंधी तालुका उमरी जिल्हा नांदेड येथे चालू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यातील चौथ्या दिवसाच्या कथेमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिध्द भागवतकथाकार श्री ह भ प प्रशांत महाराज खानापूरकर (लातूर) यांनी गाव घर. परिसर आणि देशाच्या स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. आजार झाल्यानंतर खर्च करण्यापेक्षा आजार होणार नाही यासाठी आपण स्वच्छता पाळली पाहिजे. प्रत्येक गाव स्वच्छ झाले पाहिजे राज्य स्वच्छ झाले पाहिजे आणि देशाच्या स्वच्छतेसाठी आपल्या प्रत्येकाचे योगदान असले पाहिजे. असेही ते यावेळी म्हणाले.
प्लास्टिक मुळे कचरा होतो प्लास्टिक नष्ट करता येत नाही प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेक गोवंश आणि इतर प्राणी धोक्यात येतात. गोवंश वाचवायचा असेल किंवा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणाचा प्रमाण कमी करण्यासाठी आपण प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे.सर्व भाविकांनी मी प्लास्टिक वापरणार नाही बाजारात जाताना सोबत कापडी कागदी किंवा स्वतःची पिशवी घेऊन जाईल. प्रत्येक व्यक्तीने प्लास्टिकचा कमीत कमी वापर केला तर नक्कीच ही सुद्धा एक देशसेवा धर्मसेवा आणि ईश्वर सेवा आहे.असे प्रतिपादन प्रशांत महाराज खानापूरकर यांनी केले.
संगीतमय श्रीमद् भागवत कथेमध्ये सिंधी परिसर भक्तीमय झालेला आहे. हजारो भाविकांची उपस्थितीआहे. संगीतसाथ नीलकंठ महाराज काष्टे तबला माऊली सावंत ऑक्टोप्याड प्रणव विश्वकर्मा सहगायक ऋषिकेश सोनवणे अणि अथर्व खानापूरकर यांनी केली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व गावकरी प्रयत्नशील आहेत.