हिमायतनगर। तालुक्यातील दरेगाव तांडा येथील युवक सौरभ सुधीर राठोड यांनी नीट परीक्षेत 524 गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळवले आहे. सौरभ चा नंबर धुळे येथील शासकीय मेडिकल कॉलेज एमबीबीएस कॉलेजला निवड झाली आहे त्याच्या यांनी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे
आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मतदार संघातील खेड्यातील दरेगाव तांडा येथील युवक सौरभ सुधीर राठोड यांनी शिक्षण घेतले आहे. सौरभला प्रतिकूल परिस्थितीवर मात आई वडिलांनि कठोर परिश्रम घेऊन शिक्षण दिले. सौरभने सातत्यपूर्ण अभ्यास करून यश मिळविल्याने कौतुकाचा वर्षांव होत आहे. सौरभने डॉक्टर होण्याचे आई वडीलांचे स्वप्न पूर्ण केले असून, नियोजित पद्धतीने सातत्य टिकवून यश मिळवले आहे.
इतरही विद्यार्थ्यांनी सौरभचा आदर्श घेऊन अभ्यास करून यश संपादन करावे असे आवाहन सौरभने केलं आहे. सौरभच्या यशाबद्दल आजोबा बर्फसिंग राठोड, वडील सुधीर राठोड, आई अरुणाबाई राठोड, खिसू राठोड, शोभाबाई राठोड, मनोहर राठोड, नकुल राठोड, डॉ स्वरूपा राठोड आदींसह अनेकांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.