कार्तिकी एकादशी निमित्य महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ अन्वये नांदेड शहरातील ४ धाबे व १८ मद्यपींवर कारवाई -NNL


नांदेड।
कांतिलाल उमाप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, म.रा.मंबई, सनिल चव्हाण संचालक (अंवद) उत्पादन शुल्क, म.रा. मुंबई, तसेच प्रदिप पवार विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांचे मार्गदर्शना नुसार अतुन कानडे अधीक्षक रा.उ.शु.नांदेड यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत कार्तिकी एकादशी निमित्य कोरडा दिवसाच्या अनुषंगाने नांदेड शहरात निरीक्षक राज्य उत्पदन शुल्क भरारी पथक नांदेड , निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड शहर , निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, किनवट विभाग व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड -ब विभाग यांनी दि.०४/११/२०२२ रोजी रात्री केलेल्या कारवाई मध्ये १) हॉटेल सरदारजी भगतसिंग रोड नांदेड २) , सोनु धाबा भगतसिंग रोड नांदेड, ३) सन्नी ढाबा, भगतसिंग रोड नांदेड ४) राजवाडा धाबा नमस्कार चौक, नांदेड चे मालक अनुक्रमे १) रविंदरसिंघ भगवानसिंघ फिरंगे, २) योगेंद्रसिंघ राजेंद्रसिंघ गाडीवाले, ३) सुविंदरसिंघ खेमसिंघ खालसा, ४) क्रिष्णा विजय खंडागडे हे आपल्या धाब्यामध्ये विनापरवाना तेथे येणा-या ग्राहकांना मदयसेवनास अवैध परवानगी देत असतात अशा खात्रीलायक बातमीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदर धाब्यांवर दारुबंदी गुन्हेकामी छापा घातला.


यावेळी चार धाबे चालक यांने अवैधरित्या व कसलाही दारुचा परवाना नसतांना विनापरवाना आपल्या मालकीच्या धाब्यामध्ये अनुक्रमे ५,३,६,४ असे एकूण १८ ग्राहकांना दारु पिण्यास परवानगी देवून आढळून आल्याने सदर ठिकाणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९, चे कलम ६८ अ, ब व ८४, अन्वये गुन्हा नोंदवून खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली. १) गुन्हा र. क्र.३४४/२०२२ दि.०४/११/२०२२ मध्ये हॉटेल सरदारजी भगतसिंग रोड नांदेड येथील धाबा चालक रविंदरसिंघ भगवानसिंघ फिरंगे, व मद्य पिणारे ग्राहक १) रविकांत नामदेव चावरे रा.आंबेडकरनगर, २) संदिप सुभाष चव्हाण रा.नगीनाघाट नांदेड ३) सुरज सुभाष मचल रा.वाल्मिकनगर नांदेड, ४) गजानन रघुनाथ वाळंजकर रा.सिडको नांदेड, ५) महेश जर्नादन महामुने रा.वसंतनगर नांदेड, ६) रविसिंघ बाबा राठोड रा.नगीनाघाट नांदेड या आरोपींना मा.न्यायालय नांदेड हजर केले असता धाबा चालक /मालक यास रुपये ३५,०००/- दंड व इतर मद्यसेवन करणा-या एकूण ०६ आरोपी इसमांना प्रत्येकी रु.१५००/- असा एकूण रुपये ४४,०००/- चा दंड ठोठावला. 

२) गन्हा र.क्र.२५२/२०२२ दि.०४/११/२०२२ मध्ये सोनधाबा भगतसिंग रोड नांदेड येथील धाबा चालक योगेंद्रसिंघ राजेंद्रसिंघ गाडीवाले, व ५ मद्य पिणारे ग्राहक १) अनिरुध्द पंजाब कदम रा.सुदरनगर नांदेड, २) महेश सुर्यकांत कस्तुरकर रा.काबरानगर ३) शशांक भगवानराव मैंड रा.सराफाबाजार नांदेड ४) गणेश सतिश बिडवई रा.साईनगर किनवट ह.मु.नवीन कौठा नांदेड या आरोपींना मा.न्यायालयात हजर केले असता धाबा चालक /मालक यास रुपये ३५,०००/- दंड व इतर मदयसेवन करणा-या एकूण ०५ इसमांना प्रत्येकी रु.१,५००/- असा एकूण रुपये ४२,५००/- चा दंड ठोठावला. 

३) गुन्हा र. क्र.२५३/२०२२ दि.०४/११/२०२२ मध्ये सन्नी धाबा भगतसिंग रोड नांदेड येथील धाबा चालक सुविंदरसिंघ खेमसिंघ खालसा, व मद्य पिणारे ग्राहक १) प्रविण शिवाजी पाटील रा.काबरानगर नांदेड २) निखिल नरहरराव भगत रा.शिवाजीनगर नांदेड ३) अशोक रमेश सोनवणे रा.आंबेडकरनगर नांदेड या आरोपींना मा.न्यायालय नांदेड हजर केले असता धाबा चालक /मालक यास रुपये ३५,०००/- दंड व इतर मद्यसेवन करणा-या एकूण ०३ आरोपी इसमांना प्रत्येकी रु.१५००/- असा एकूण रुपये ३९,५००/- चा दंड ठोठावला. 

४) गुन्हा र. क्र.१२८/२०२२ दि.०४/११/२०२२ मध्ये राजवाडा धाबा नमस्कार चौक, नांदेड येथील धाबा चालक क्रिष्णा विजय खंडागडे, व मद्य पिणारे ग्राहक १) लक्षमण उध्दव पवार रा.वाहतुकनगर नांदेड, २)सुनिल किसन राठोड रा.वाहतुकनगर नांदेड, ३) सलमानखान सुनैअलीखान रा.लेबर कॉलनी नांदेड ४) मो.इम्रान मो.सरवर रा.श्रावस्तीनगर नांदेड या आरोपींना मा.न्यायालय नांदेड हजर केले असता धाबा चालक /मालक यास रुपये ३५,०००/- दंड व इतर मद्यसेवन करणा-या एकूण ०४ आरोपी इसमांना प्रत्येकी रु.५००/- असा एकूण रुपये ३७,०००/- चा दंड ठोठावला.

वरील चारही कारवाईमध्ये चार धाबामालक आरोपींना एकुण १,४०,०००/- रुपये व १८ मद्य सेवन करणाऱ्या आरोपींनी एकुण २३,०००/- रुपये असा एकुण १,६३,०००/- रुपये इतका दंड मा.न्यायालयाने ठोठावला. ही कारवाई श्री. अतल अ. कानडे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये श्री.बी.व्ही.हिप्परगेकर निरीक्षक भरारी पथक, श्री.एम.शेख, श्री. आनंद चौधरी, श्री.एम.एम.बोदमवाड, श्री.ए.एम.पठाण सर्व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग व तसेच सर्व दुय्यम निरीक्षक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, जवान आणि जवान-निवाहन चालक राज्य उत्पादन शुल्क विभाग, यांनी कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली.

या कार्यवाही नंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग गाचे अधीक्षक यांनी अवाहन करत महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (क), (ख) अन्वये अवैध हॉटेल/धाबा/क्लब इत्यादी चालक मालक यांनी अवैध हॉटेल/धाबा/क्लब इत्यादी मध्ये शासन मान्य अनुज्ञप्ती नसतांना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास त्यांना तीन ते पाच वर्षा पर्यंत कारावासाची शिक्षा, किंवा रु.२५०००/- ते ५०,०००/- पर्यंत दंड, किंवा दोन्ही होवू शकते.

तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ८४ अन्वये एखादी ग्राहक/व्यक्तीने अवैध हॉटेल/धाबा/क्लब इत्यादी ठिकाणी मद्य प्राशन केल्यास त्यांना रु ५,०००/- पर्यंत दंड होवू शकतो. म्हणून "नागरीकांना अहवान करण्यात येते की, कुठल्याही अवैध ढाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारु पितांना आढळन आल्यास ढाबा मालकसह मदयसेवन करणा-या इसमा विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल' असे (अ.अ.कानडे) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड यांनी कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी