प्रतिकूल परिस्थितीवर मात; महेंद्र भोळे यांची राज्यकर निरीक्षक वर्ग२ पदावर निवड -NNL


लोहा|
लोहा लातुक्यातील धानोरा मक्ता येथील रहिवाशी पण सध्या हडको येथे वास्तव्याला असलेले सौ. कमलबाई व लक्षणराव भोळे यांचे चिरंजीव महेंद्र यांची एमपीएससी द्वारा झालेल्या राज्य कर निरीक्षक वर्ग २ या पदासाठी निवड झाली आहे. जिद्द आणि मेहनत घ्यायची तयारी असेल तर कठीण प्रसंगातून यशाला गवसणी घालता येथे हे महेंद्र यांनी सिद्ध केले.

धानोरा मक्ता येथील जनाबाई मल्हारी भोळे यांचे चिरंजीव लक्षणराव भोळे हे टेक्सकॉम येथे कामाला गेले आणि हडको नांदेड येथे स्थायिक झाले. हे दाम्पत्य सहकार्यवृत्तीचे गरजू लोकांच्या मदतीला धावून जातात.. महेंद्र भोळे हा एककुलता एक मुलगा, यूपीएससी साठी तयारी केली. सोबतचे जिल्हाधिकारी झाले. एमपीएससी मध्ये तहसीलदार, उपजिल्हाधिकारी पदासाठी मुलाखती पर्यंत मजल मारली पण अपयश आले.पण तो खचला नाही.परिस्थिती जेमतेम होती.

पुढे तलाठी म्हणून  नौकरी मिळाली पण राजीनामा देऊन पुन्हा अभ्यासाकडे वळला. पत्नी किरण  एम एस्सी पदव्युत्तर आहेत. तिची खंबीर साथ मिळाली.सिडको येथे सह्याद्री अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु वडिलांचे बायपास झालेले पण मित्र परिवार, आजी नगरसेविका राहीबाई खिल्लारे,मामा नगरसेवक बालाजी खिल्लारे यांचे पाठबळ मिळाले. आणि कठीण काळातही अभ्यास करत महेंद्र यानी राज्य कर निरीक्षक वर्ग२ साठी यश संपादन केले.

त्याच्या यशाबदल मित्र आरटीओ कार्यालयातील मुख्य लिपिक रोहित कंधारकर, प्रा गणेश सरपे यांनी आनंद व्यक्त केला. लोहा येथे बालाजी खिल्लारे व मित्रांनी महेंद्र यांचा सहकुटुंब सत्कार केला. तसेच जिज्ञासा अभ्यासिकाच्या वतीने संचालक हरिहर धुतमल, प्रवीण धुतमल यांनी सत्कार केला .जिद्द व मेहनत असेल तर अडचणीतून यशाला  गवसणी घालता येथे हेच महेंद्र यांच्या यशातून सिद्ध झाले.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी