नांदेड| भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, प.पु.डॉ.बाबासाहेब यांच्या नांदेड येथील पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना व भारतीय संविधान शीलेसही भारतीय संविधान गौरव दिनी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने अभिवादन करण्यांत आले.
याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे माजी विभागीय सचिव प्रकाश कांबळे,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.प्रदिप नागापूरकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा. भवरे, नरेश दंडवते, कृष्णा उमरीकर, त्रिरत्नकुमार भवरे,महानगर मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रविंद्र संगनवार, हर्ष कुडलवाडीकर, ओमप्रकाश पत्रे, प्रशांत गवळे, राम तरटे, सुभाष काटकांबळे तसेच निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे उपस्थित होते.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न, प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान गौरव दिनी अभिवादन करून नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली हाही एक योगायोग आणि अभिनंदनीय प्रसंगच म्हणावा लागेल.