हिमायतनगर। तालुक्यातील अतिवृष्टीने हवालदार झालेल्या शेतकऱ्यांचे महावितरण कंपनीने विद्युत खंडित करून शेतकऱ्यांचे विज बिल वसुली करत आहे. आज हिमायतनगर उपविभागीय महावितरण कार्यालय येथे उपविभागीय अभियंता नागेश लोणे यांना एका निवेदनाद्वारे नितीन राठोड यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह एका निवेदनाद्वारे शेतकऱ्यांची वीज बिल वसुली टप्प्याटप्प्याने करावी व विद्युत खंडित केलेले सुरळीत करण्यात यावे अशी मागणी केली अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे त्यांनी थेट इसारही देले.
हिमायतनगर तालुक्यामध्ये मागील जुलै ऑगस्ट महिन्यासह परतीच्या पावसा पर्यंत शेतकऱ्यांचे वरून राजाने अतोनात नुकसान केलेला आहे ही वास्तुस्थिती असून, हिमायतनगर तालुका ओला दुष्काळग्रस्त आहे. तरी महावितरण कंपनी ने विद्युत खंडत करण्याचे धडाका सुरू केले आहे. ते थांबवा शेतकरी मायबापचा खरीप पिक हातातून गेलेला आहे रब्बीतून काहीतरी शिल्लक राहील का..? या अशाने शेतामध्ये राबराब राबताना दिसत आहे. म्हणून नितीन राठोड त्यांच्या शिष्टमंडळासह एका निवेदनाद्वारे विनंती केली आहे.
रब्बीचे नुकतेच पेरणी करण्यात आलेली आहे परंतु विज बिल वसुली करण्यासाठी विद्युत खंडित केल्यामुळे पिकाचे कोंबळे सुकून जात आहे. महावितरण कंपनीने वीज बिल वसुली साठी विद्युत खंडित न करता आपण टप्प्याटप्प्याने वीज बिल वसुली करावे व शेतकऱ्यांना सहकार्य करावे अन्यथा एक शेतकरी म्हणून आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असे नितीन राठोड बोलले व त्यांच्यासोबत संतोष बन्सी आडे प्रताप रुपला आडे शुभम लक्ष्मणराव जाधव कपिल पाटील धर्मा फुलसिंग जाधव विठ्ठल जाधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.